भद्रावती (वि.प्र.) : स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष मार्गदर्शन करताना डॉक्टर ज्ञानेश हटवार यांनी मार्गदर्शन करताना संविधान भारताला दिशादर्शकचे महत्वपूर्ण कार्य करत आहे असे सांगितले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ प्रशांत पाठक व प्रा किशोर ढोक हे व्यासपीठावर उपस्थित होते. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी संविधानाने आपल्याला जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला, ते देशाला दिशादर्शक आहेत, त्याचा सन्मान केला पाहिजे असे मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत पाठक यांनी संविधानाचे महत्व विषद करताना समता, न्याय , स्वतंत्र, बंधुता हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असे सांगितले. प्रा. किशोर ढोक यांनी संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. नताशा नागरे या विद्यार्थिनीने केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी कु. समीक्षा पोतराजे, कु. लावण्या खंडाळकर, कु. आचल ऊईके, अथर्व श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कु. तन्वी आणि ग्रुप ने गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका नागपुरे हिने केले, तर आभार प्रदर्शन मीनाक्षी गेडाम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रेमा पोटदुखे, राकेश आवारी, माधव केंद्रे, कमलाकर हवाईकर, प्रतीक नागपुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.