नागपूर (वि.प्र.) : संविधान दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिके तर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. पल्लवी प्राथमिक व ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नंदनवन नागपूर येथे झोनल प्राचार्या सौ अरुणा कडू मुख्याध्यापिका जोत्सणा मांजरखेडे यांच्या संयुक्त अध्यक्षतेत व पर्यवेक्षक जामुवंत वांढे अधिकारी श्री. विठोबा रामटेके यांच्या उपस्थितीत स्वच्छता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचा स्वाभिमान वाढावा यासाठी त्यांना परिमंडळ अधिकारी श्री रामटेके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.