विविध पक्षातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश ..!

बल्लापुरात वंचितमध्ये फुट; इतर पक्षही भाजपसोबत .. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून निर्णय .!

बल्लारपूर (का.प्र .) : गेल्या दहा दिवसांमध्ये तीनवेळा काँग्रेसला खिंडार पडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीमध्येही फुट पडली आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून वंचितमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. तर इतर पक्षांनी देखील भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिस्तीचा अभाव बघायला मिळत आहे. त्या तुलनेत भाजपमध्ये शिस्तबद्ध काम आहे. याचाच परिणाम म्हणून इतर पक्षांचे पदाधिकारी भाजपकडे आकर्षित होत आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील काही पक्षांनी ना. मुनगंटीवार यांचा विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन भाजपची कास धरली आहे. 
वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रमेश लिगमपल्लीवार यांच्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये महिला आणि युवकांची संख्या लक्षणीय आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष बल्लारपूर किशोर पंदीलवार, भाजपा शाखा अध्यक्ष विसापूर गणेश टोंगे,विजय घिरडकर, राजू डाहुले,विठ्ठल तुराणकर यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत जात हा फॅक्टर चालला होता. पण आता चालणार नाही, हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्ध करून दिले आहे. वंचित बहुजन आघाडीसह इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत, असे स्पष्ट दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.