मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर द्वारे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम .!
बल्लारपुर (का.प्र.) : मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर द्वारा चंद्रपूर जिल्ह्यातील वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला. मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर द्वारा वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडवितांना घ्यावयाची दक्षता यासंबंधी दोन दिवसीय मार्गदर्शन आभासी पद्धतीने राबवण्यात आले.
या मराठी कृती पत्रिका मार्गदर्शन उपक्रमाचे उद्घाटन डॉ ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे, खजिनदार, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य हे होते. प्रमुख अतिथी डॉ विजय हेलवटे, सल्लागार, मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य हे होते.
उद्घाटन प्रसंगी "मराठी विषय शिक्षक महासंघ ही फक्त शिक्षकांची संघटना नसून, मराठी विषय समृद्ध करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असते, हा त्यातीलच एक भाग आहे . या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक गुणांकन प्राप्त करता येईल" असे मार्गदर्शन केले.
मराठी विषय कृतीपत्रिका मार्गदर्शन उपक्रमात मराठी विषयातील पाचही घटकावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या दिवशी गद्य या विभागावर डॉ. अंजली खताळ मुंबई, सल्लागार मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ शालिनी तेलरांधे, नागपूर यांनी कथा साहित्यप्रकार यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले . माझी प्राचार्य तथा माजी मुख्य समिक्षक नागपूर बोर्ड नागपूर धर्मराज काळे सर यांनी निबंध लेखन यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
कृतीपत्रिका मार्गदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पद्य विभागावर डॉ विठ्ठल चौथले गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभले. उपयोजित मराठी या घटकावर डॉ सुधीर रायपूरकर नागपूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. व्याकरण या घटकावर माजी प्राचार्य धर्मराज काळे, सल्लागार, मराठी विषय शिक्षक महासंघ, चंद्रपूर यांनी व्याकरण विषय विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.
या आभासी सभेचे प्रास्ताविक प्रा. नामदेव मोरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी मोहितकर, सरिता कांचेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पद्मा पालांदुरकर, रेणुका देशकर यांनी केले. या दोन दिवशीय आभासी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा. गजानन सातपुते, सचिव प्रा. देविदास सालवटकर,
प्राचार्य डॉ सुधीर मोते, किशोर ढोक, प्रधान सर, सोनकुसरे सर, गहाने सर, समस्त मराठी विषय शिक्षक पदाधिकारी, समसत शिक्षक यांनी सहकार्य केले. या ऑनलाईन सभेला समस्त राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, तसेच जिल्हा पदाधिकारी, मराठी विषय शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
भद्रावती चा नियोजित रोटरी उत्सव मेला स्थगित .. नवीन तारीख लवकरच जाहीर करणार .!
भद्रावती : भद्रावती येथे होणारा नियोजित रोटरी उत्सव मेला तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आला. रोटरी उत्सव मेल्याची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे अध्यक्ष किशोर खंडाळकर यांनी जाहीर केले.
भद्रावती येथे रोटरी क्लब भद्रावती तर्फे घेण्यात येणारा नियोजित रोटरी उत्सव मेला दिनांक २० ते २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे या तारखेला होणारा नियोजित रोटरी उत्सव मेला हा पुढे ढकलण्यात आलेला आहे.
पुढे घेणाऱ्या रोटरी उत्सव मेल्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत अध्यक्ष किशोर खंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या नियोजित मेळाव्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात घेण्यात आलेले ऑडिशन हे कायम राहून, पुढे होणाऱ्या रोटरी उत्सव मेल्यात त्या समस्त स्पर्धकांना संधी मिळणार आहे. रोटरी मेल्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, काही तांत्रिक अडचणीमुळे हा मेळा पुढे ढकलण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेत रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर खंडाळकर, सचिव आत्माराम देशमुख, माजी अध्यक्ष व उत्सव चेअरमन अनिलभाऊ धानोरकर, सुनीलभाऊ पोटदुखे, डॉ माला प्रेमचंद, सुधीर पारधी, डॉ ज्ञानेश हटवार, तथा रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.