व्हॉइस ऑफ मीडिया चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली ..!

अनिल बाल सराफ जिल्हाध्यक्ष आणि प्रमोद वाघाडे कोरपना तालुका अध्यक्ष .. आशिष रैच डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष आणि राजू जोगड साप्ताहिक विंगचे नवे जिल्हाध्यक्ष .!

बल्लारपुर (का.प्र.) : देशातील सर्वात मोठ्या मीडिया संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांची निवड प्रक्रिया बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील कन्नमवार सभागृहात लोकशाही पद्धतीने पार पडली. व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात राजुराचे अनिल बाल सराफ यांची निवड करण्यात आली, तर कोरपना तालुका अध्यक्षपदी नांदाचे प्रमोद अर्जुन वाघाडे सर यांची बिनविरोध निवड झाली.
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेच्या कन्नमवार सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाच्या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे, विदर्भ अध्यक्ष किशोर करंजेकर आणि वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदासाठी वरोऱ्याचे अनिल पाटील आणि राजुराचे अनिल बाल सराफ यांची नावे नामांकित करण्यात आली होती. उपस्थित १३० मतांपैकी ८१ मते घेऊन अनिल बाल सराफ विजयी झाले, तर प्रतिस्पर्धी अनिल पाटील यांना ४८ मते मिळाली आणि १ मत अवैध ठरले.



तसेच, आशिष रैच यांची डिजिटल मीडिया विंगचे जिल्हाध्यक्ष आणि राजू भाई जोगड यांची साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यानंतर सर्व तालुक्यांच्या अध्यक्ष पदांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रमोद वाघाडे (कोरपना), गणेश बेले (राजुरा), प्रा. विजय गायकवाड (सावली), राजेश रेवते (भद्रावती), सुग्रीव गोतावळे (जिवती), राजू झाडे (गोंडपिपरी), शंकर महाकाली (बल्लारपूर), प्रा. राजू रामटेके (सावली), चेतन लुथडे (वरोरा) आणि शशिकांत गणवीर (मुल) यांची अध्यक्षपदी निवड झाली.



नवीन जिल्हाध्यक्ष अनिल बाल सराफ यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजू जोगड, आशिष रैच, श्रीहरी सातपुते आणि गणेश रहिकवार यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व विजयी उमेदवारांना जिल्हाभरातून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.