लवकरच होणार जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड .!
बल्लारपुर (का.प्र.) : भारतातील सर्वात मोठी व जवळपास तेरा देशांत पसरलेली पत्रकार संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाची चंद्रपूर येथिल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या आमसभेला जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर ह्यांच्या प्रतीमेस व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे, विदर्भ अध्यक्ष किशोर करांजेकर, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख ह्यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून आमसभेची सुरुवात झाली.
मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधुन त्यांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याचे तसेच उद्देशांचे अवलोकन करून देण्यात आले. मावळते जिल्हाध्यक्ष तसेच राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे ह्यांनी मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पत्रकारांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना ह्या कालावधीत जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
ह्यानंतर जिल्ह्याच्या पॅरेंट बॉडी, साप्ताहिक विंग तसेच डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. लोकशाही पद्धतीने झालेल्या ह्या निवडणुकीत निवडणूक निरीक्षक म्हणून विदर्भ अध्यक्ष किशोर करांजेकर, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख ह्यांनी जबाबदारी सांभाळली तर निवडणूक अधिकारी म्हणून आशिष रैच, जितेंद्र जोगड व श्रीहरी सातपुते ह्यांनी संपुर्ण कार्यवाही पार पाडली.
सर्वप्रथम जिल्ह्याच्या पॅरेंट बॉडी जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. ह्या पदासाठी एकमत नसल्याने अनिल पाटील व अनिल बाळसराफ ह्यांच्यात थेट लढत झाली. सदस्य मतदारांनी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करून अनिल बाळसराफ ह्यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली तर साप्ताहिक विंगचे जितेंद्र जोगड ह्यांना अविरोध जिल्हाध्यक्ष म्हणून मनोनित करण्यात आले.
डिजिटल विंगच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आशिष रैच व संजय कन्नावार ह्यांनी आपली उमेदवारी दाखल केली मात्र डिजिटल विंगच्या सर्व सदस्यांनी चर्चेअंती एकमताने चांदा ब्लास्टचे उपसंपादक आशिष रैच ह्यांची निवड केल्याचे संजय कन्नावार ह्यांनी स्वतः आपली उमेदवारी मागे घेतली नविन जिल्हाध्यक्षांचे नाव घोषित करून डिजिटल मीडियाच्या एकसंधपणा दाखवुन दिला. उपस्थित सर्व पत्रकार सदस्य तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी तीनही नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ह्यानंतर तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली त्यात गणेश बेले, राजुरा, प्रमोद वाघाडे, कोरपना, प्रा. विजय गायकवाड, सावली, राजेश रेवते, भद्रावती, सुग्रीव गोतावळे, जिवती, राजु झाडे, गोंडपिपरी, शंकर महाकाली, बल्लारपूर, प्रा. राजु रामटेके सावली, चेतन लुथडे, वरोरा, शशिकांत गणवीर मुल ह्यांची निवड करण्यात आली.