विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकरांच्या कार्याचा आदर्श घ्यावा... डॉ सुधीर मोते
भद्रावती (वि.प्र.) : यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख अतिथी प्रा. भीष्माचार्य बोरकुटे, किशोर ढोक, प्रेमा पोटदुखे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ वा महापरिनिर्वाण दिन यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी देशेतील प्रसंगावर भर टाकून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून भिष्माचार्य बोरकुटे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपल्या जीवनात बाळगावा असे सांगितले. प्रा. किशोर ढोक यांनी मार्गदर्शन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी आयान शेख, कु. मिनाक्षी गेडाम, मोना वर्मा, माहि ढोक, श्रावणी खंडाळे, शरण्या अष्टूनकर, प्रणाली, वाटेकर, वैशाली सोनटक्के, श्रुतिका नागपुरे, नेहा कुरेशी , प्रांजली राजुरकर ,नताशा नागरे, खूशी आत्राम , आशिका आसामपल्लीवार आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काही विद्यार्थिनींनी या प्रसंगी गीत गायन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समीक्षा पोतराजे व प्रा वर्षा दोडके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अथर्व श्रीवास्तव यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.