शिक्षण क्षेत्रातल्या समस्या सोडविण्याला प्राधान्य- मान. सुधाकरराव अडबाले
बल्लारपुर (का.प्र.) : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अधिवेशन 2025 रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी माऊंट इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या येथे पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान. व्ही. यु. डायगव्हाणे माजी शिक्षक आमदार हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक मान. अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य (नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ) हे होते, प्रमुख मार्गदर्शक मान. सुधाकरराव अडबाले विधान परिषद सदस्य (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), स्वागताध्यक्ष मान. भाऊराव झाडे अध्यक्ष चंद्रपूर मल्टीपर्पज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्रमुख अतिथी मान. अरविंद देशमुख प्रांतीय अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मान. जगदीश जुनगरी सहसचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळ मुंबई, विशेष अतिथी मान. रविंद्र नैताम जिल्हाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गडचिरोली, मान. अजय लोंढे जिल्हा कार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गडचिरोली, मान. केशवराव ठाकरे जिल्हाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूर, मान. श्रीहरी शेंडे जिल्हा कार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूर, मान. सुभाष ताजने, मान. श्रीधरराव फटाले माजी मुख्याध्यापक, मान. अनिल वागदरकर माजी मुख्याध्यापक, मान. मारोतराव अतकरे, मान. डोर्लीकर माजी मुख्याध्यापक, मान. नरेंद्र भोयर, मान. प्रवीण चटप जिल्हाध्यक्ष विज्युक्टा चंद्रपूर मान. प्रमोद उरकुडे सचिव विज्युक्टा चंद्रपूर, मान. दिगंबर कुरेकर, मान. राजेंद्र खाडे ,मान. वसुधा रायपुरे महिला प्रतिनिधी यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमत: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला त्यांच्या जयंतीनिमित्त मार्ल्यापण करण्यात आले.मान. दीपक धोपटे यांनी जिजाऊ वंदना गायन केली. स्वागत गीत माऊंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या चमूनी गायन केले. मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय बल्लारपूरच्या चमूनी नृत्य गीत सादर केले.अधिवेशनात विद्यार्थ्यांनी " ये मेरा इंडिया " हे देशभक्तीपर गीत सादर केले.आपल्या प्रास्तविकात मान. केशवराव ठाकरे यांनी सांगितले की, मी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची धुरा पालकत्व समजून सांभाळली आहे.
अहवाल वाचन करताना मान. श्रीहरी शेंडे यांनी सांगितले की, दहावी- बारावी मधे जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याची परंपरा आमच्यातर्फे सातत्याने चालू आहे. स्वागताध्यक्ष मान. भाऊराव झाडे यांनी सांगितले की, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आम्हाला सातत्याने सहकार्य मिळत आहे त्यांच्यामुळे आमची प्रगती होत आहे. मान. अरविंद देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात मेहनत वाया जाऊ देत नाही आणि आर्थिक प्रश्न सोडवल्या जातात. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेझीम पथक चा सत्कार मेडल आणि प्रमाणपत्र देऊन केल्या गेला. कार्यक्रमा कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. व्ही. यु. डायगव्हाणे यांनी सांगितले की, 54 दिवसाच्या संपामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने फार मोठे योगदान 1977 मध्ये दिले. आणि आंदोलनाशिवाय कोणती सरकार चार्जिंग होत नाही. उद्घाटन भाषण करताना मान. अभिजीत वंजारी यांनी सांगितले की, विधान परिषदेचे शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. जे प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही, त्यासाठी आम्ही जनता दरबार लावतो.
प्रमुख मार्गदर्शक मान. सुधाकरराव अडबाले यांनी भाषण करताना आर. टी. ई. कायदा 2009, 36 अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये समायोजन, संचमान्यता दर्जावाढ जी. आर. रद्द, मुख्याध्यापकांना संरक्षण, शिक्षक भरती (पवित्र पोर्टल), जुनी पेन्शन योजना, अनुदान, सभागृहात दिलेली आश्वासन पाळली जात नाही, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रोस्टर मंजूर, बीएलओ यांना न्याय मिळवून देणे आदी बाबत माहिती दिली.याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला वेळोवेळी योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा, समाजातील नामवंताचा व शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन मान. सुनीता कांबळे मॅडम, मान. चंद्रकांत पावडे, मान. प्रकाश ऊरकुंडे सर तर आभार प्रदर्शन मान. दीपक धोपटे यांनी केले.याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूर शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.