पणज (वि.प्र.) : इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी एकमेकांना दिल्या. हरकत नाही. दिल्याच पाहिजे. नवीन वर्ष कोणी तीर्थाटन करून, कोणी जंगल सफारी करून, कोणी मुलाबाळांसह, आणी नवीन तरुणतरुणींनी पब,बार महागड्या हॉटेल मध्ये, कोणी घरच्या घरी अशा प्रकारे नवीन वर्ष साजरे केले. पण मी मात्र जिसका कोई नही अशा गरजवंत आदिवासींना माणुसकी च्या भिंत वरील कपडे वाटुन नवीन वर्ष साजरे केले. सदर कार्यक्रम पणज येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री.माता महालक्ष्मी देवीचे मंदीराचे आवारात संपन्न झाला. कार्यक्रमास आर्ट ऑफ लिव्हिंग चे अनिल रोकडे, गणेश भारसाकडे, सुरेश सावीकार, रमेश अघडते यांचे उपस्थितीत भोईराज कॅलेंडर निर्माता डॉ. रतनलाल तायडे भोई यांनी सदर कार्यक्रम आयोजित करुन आदिवासींना कपडे वाटुन नवीन वर्ष साजरे केले.