महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, शाखा बल्लारपूरच्या वतीने फळ व बिस्कीटाचे वाटप .!

प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटें यांचा वाढदिवस निमित्ताने उपक्रम .!

बल्लारपूर (का.प्र.) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटें यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी साजरा होत असून चंद्रपूर जिल्ह्यात यंदाही उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी दिली आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,शाखा बल्लारपूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना फळ व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले यावेळी मा.सुनिल गाडे पोलीस निरीक्षक बल्लारपूर व डॉ.गजानन मेश्राम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले होते.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संघटने तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले यावेळी तालुका संघांचे अध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, तालुका सचिव दिपक भगत, वसंत मून, देवानंद देशभ्रतार, निळकंठ मजगवळी, गौतम कांबळे, लखपती घुगलोत, मिलिंद पुणेकर, संतोष बडकेलवार, गणेश टोंगे, वैभव धरनिवार ई ची उपस्थिती होती.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.