बल्लारपुर( का.प्र.) : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 12.02.2025 रोजी एका कार्यक्रमाद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के. रांगणकर, आर. बी. अलाम यांची मंचावर उपस्थित होती.
प्रथमत: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलेत. शाळेचे दहावीचे विद्यार्थी कु. श्रावणी मत्ते, लोकेश घोडेस्वार, नमो खंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यु. के. रांगणकर, आर. बी. अलाम, एम. डी. टोंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक व संचालन आर. के. वानखेडे व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.निरोप समारंभ कार्यक्रमात चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले, सुंदराबाई वैद्य, वर्षा ठाकरे सहित विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शेवटी नाश्ता वाटप करण्यात आला.
बल्लारपूर नगर परिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संप मिटला ..!
भाजपा कामगार आघाडीच्या प्रयत्नांमुळे थकीत वेतन मिळाले .!
बल्लारपुर : भाजप कामगार मोर्चाच्या प्रयत्नांमुळे, बल्लारपूर नगर परिषदेतील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांचे दोन महिन्यांचे थकित वेतन मिळाले आणि बुधवारी त्यांनी त्यांचा अनिश्चित काळासाठीचा संप संपवून कामावर परतले. प्रमुख स्वच्छता कर्मचारी विशाल मोरे, रणजीत पारचा, संजू एलकापल्ली, जयराज मोरे, धनराज किणेकर, गीता बहुरिया, उषा रामटेके, लता उमरे, सरिता धिंगण आणि सुनीता अँथनी यांनी स्थानिक आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अजय दुबे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मिथलेश पांडे, भाजपा कामगार आघाडी बल्लारपूर शहर अध्यक्ष श्रीनिवास कोलावार आणि भाजपा कामगार आघाडी जिल्हा संघटनेचे सरचिटणीस दिनेश गोंदे यांचे आभार मानले आहेत.
भाजप कामगार मोर्चा ने संपाला पाठिंबा दिला होता आणि प्रदेश सरचिटणीस अजय दुबे यांनी मुख्याधिकारी विशाल वाघ आणि आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली होती. मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पगार देण्याची व्यवस्था केली