मुंबई आणि पुणे गाड्या दररोज चालवा - श्रीनिवास सुंचुवार

चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना बल्लारशाहने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन दिले .! 

बल्लारपूर (का.प्र.) : दि.14/02/2025 रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेले मध्य रेल्वे मुंबई महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांना माजी जेड आर यू सी सी सदस्य व चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे 1) गाडी क्र. 22151/22152 काझीपेठ पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा ऐवजी दररोज करावे.
2) गाडी क्र. 22109/22110 बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा ऐवजी दररोज करावे.
3) ट्रेन क्र. 11401/11402 नंदीग्राम एक्स्प्रेसची वेळ सकाळी 08.30 ऐवजी सकाळी 11.00 अशी करण्यात यावी आणि चार स्लीपर कोच वाढवण्यात यावेत.
4) गाडी क्र. 11121/11122 भुसावळ-वर्धा ट्रेन बल्हारशाहापर्यंत विस्तारित करावी
5) गाडी क्रमांक 01316/01315 वर्धा - बल्हारशाह ट्रेन भुसावळपर्यंत वाढवावी.
महाव्यवस्थापकांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत
बल्लारशाह -कुर्ला ट्रेन दैनिक आणि काझीपेठ ते पुणे ट्रेन तीन दिवसांचा करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, डीआरयूसीसी सदस्य गणेश सैदाणे, माजी डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर, ज्ञानेंद्र आर्य, श्रीनिवास कंदकुरी, रामेश्वर पासवान आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.