भद्रावती (वि.प्र.) : आज भद्रावती येऊ जयहिंद फोडेशन महाराष्ट्र राज्य जिल्हा चंद्रपूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. भारतीय सेवेतून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ ज्ञानेश हटवार, प्रमुख पाहुणे जि के कुमरे डेप्युटी कमिशनर चंद्रपूर ( रिटायर). व सत्कार मुर्ती माजी सैनिक मारूती महातळे सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून व शिवाजी महाराज, भारत माते च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
अध्यक्षीय भाषण करताना प्रा डॉ ज्ञानेश हटवार यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कर्तुत्वाचा उल्लेख केला. त्यांचे कार्य हे जीवनात आदर्शवत आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी अंगीकारला पाहिजे असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी भारतीय सेनेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक मारूती महातळे यांचा शाल पुष्पगुच्छ व जयहिंद मोमेटो देऊन जयहिंद फोडेशन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष विजय मधुकर तेलरांधे माजी सैनिक यांनी सपत्नीक सत्कार केला. प्रा ज्ञानेश डॉ हटवार सरांचा सत्कार माजी सैनिक अरूण खापने सरांनी केला व जि के कूमरे डेप्युटी कमिशनर चंद्रपूर यांचा सत्कार माजी सैनिक अरूण मत्ते सरांनी केला. या प्रसंगी भारतीय सेनेतून निवृत्त झालेले महातळे यांनी आपले अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षितीज शिवरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिक दानव यांनी केले तर आभार प्रदर्शन जयहिंद फाउंडेशनचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विजय तेलरांधे यांनी केले.या कार्यक्रमात हजारे साहेब, स्वातीताई, दिपा ताई, तेजस्वीनी ताई, कुमार पराग, सुमीत, गौरव आणि मधुकर तेलरांधे, महातळे ताई , तसेच माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.