साई सरकार ग्रुप तर्फे रक्तदान शिबिर व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न .!

बल्लारपुर (का.प्र.) : दि.२/२/२०२५ ला साई सरकार ग्रुप च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर व साई सरकार ग्रुप चे अध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळेस बल्लारपूर शहरांतील सहकारी मित्र तसेच शुभचिंतकांनी रक्तदान करून 51 हा आकडा नोंदविला आहे..या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथील रुग्ण कल्याण टीम चे सहकार्य लाभले.तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाला 650 महिला उपस्थित होत्या. या वेळी साई सरकार ग्रुप चे अध्यक्ष मोहीत डंगोरे सह अरमान शेख ,अनिकेत दुबे,मनीष राजभर, इरशाद शेख, अनिकेत दुबे, स्वप्नील घुसे, वमशी घंटोला, धनसिंह पटेल, आकाश शर्मा, शिवम वाघमारे, महिला शामला डंगोरे, प्राची बोमनवार, भाग्यश्री पोगडे, छाया गजपुरे, विमल मेश्राम, रंजना गोरडवार,ललिता ताजणे,सुनंदा गोरघाटे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.