चंद्रपुर (वि.प्र.) : कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम राखण्याचे दृष्टीने दिनांक 17/02/2025 सोमवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता पोलीस ठाणे रामनगर येथे आगामी शिवजयंती उत्सव (शासकीय) निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.हि बैठक रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, उपस्थितीत होते.या बैठकीला संबोधित करताना रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी सर्व शासकीय नियमाची माहिती दिली तसेच मुख्यात: सध्या 12 वीच्या परीक्षा सुरू असल्याने ध्वनिक्षेपकाचे आवाज कमी ठेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळा निर्माण होऊ नये या करिता आपली सामाजिक जबाबदारी पाळावी अशी देखील विनंती करीत कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करीत या उत्सवादरम्यान आपण आपल्या समितीच्या कर्तव्यदक्ष सदस्यांची मिरवणुकी दरम्यान वॉलंटियर म्हणून नेमणूक करावी.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होणार नाही या बाबतीत गांभीर्याने दखल घ्यावी.सर्व धार्मिक स्थळाच्या प्रती आदर राखून ध्वनिक्षेपकाचा वापर करावा कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची विशेष दखल घ्यावी. अशी देखील विनंती त्यांनी या बैठकीदरम्यान केली. महाप्रसाद च्या आयोजन करणाऱ्या समित्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांची नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी जेणेकरून कोणालाही विषबाधा होणार नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने जयंती उत्सव समितीने नियमाचे पालन करावे.आपण हा उत्सव अत्यंत शांततेने आनंदात उत्साहात साजरा करणारच असे विश्वास देखील याप्रसंगी रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी व्यक्त केले. या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली तसेच चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्या अंजलि घोटेकर यांनी ही महत्वाच्या सूचना केल्या.
या बैठकीला शांतता समितीचे सदस्य प्रियदर्शी मेश्राम, गुलाब पाटील, शिवजयंती उत्सव समितीच्या ॲड. सारिका संदुरकर, शिवजयंती उत्सव समितीचे आकाश ठुसे, शिव मावळे संघटनाचे अध्यक्ष राहुल वाघ, सुधीर पोयला, अंकित लाडे, अनिल सागर नातर, सुरेंद्र चंदनखेडे, विक्की बावणे, कुंतल चौधरी, विशेष शाखेचे सुभाष शिडाम दिलीप लाकडे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.