चंद्रपूर (वि.प्र.) : कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम राखण्याचे दृष्टीने दिनांक 17/02/2025 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे आगामी शिवजयंती उत्सव (शासकीय) निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हि बैठक चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, उपस्थितीत होते.
या बैठकीला संबोधित करताना चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सर्व शासकीय नियमाची माहिती देत कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची दक्षता घेऊन हा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने साजरा करावा तसेच बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होणार नाही याचे भान भान ठेवीत, सामाजिक जाणीव ठेवून ध्वनीचेक्षेपकाचे आवाज मर्यादित ठेवावे तसेच महाप्रसाद च्या आयोजन करणाऱ्या समित्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांची नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी जेणेकरून कोणालाही विषबाधा होणार नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने समितीने नियमाचे पालन केल्यास हा उत्सव आनंदाने व उत्साहाने पार पडणारच असा विश्वास देखील याप्रसंगी प्रभावती एकुरके यांनी व्यक्त केला.
या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली यांनी तसेच चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य प्रवीण खोब्रागडे यांनी देखील महत्त्वाच्या सूचना केल्या. या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य ॲड. आशिष मुंदडा,चंद्रपूर शहर शांतता समितीचे सदस्य प्रशांत हजबन, सागर खोब्रागडे, मोरेश्वर खैरे, दर्शन बुरडकर,आसिफ खान पठाण, श्रीमती रेखा धनंजय दानव, संतोष जाधव, तसेच शिवजयंती उत्सव समितीचे नंदू नागरकर, गणेश अडबाले, अनुप चौधरी, संतोष कुचनकर, हरीश ससनकर, दिलीप रिंगणे, निमेश मानकर, निशिकांत देशमुख, संजय तुरीले, सचिन दुधे, श्याम, साखरकर पंडित, ढोणे, किशोर मेश्राम, संजय टोंगे, आनंदराव पिंपळशेंडे, विशाल काळे, वैभव मेश्राम, शिवम काळे, आशिष येड़ीमे, प्रकाश चालूरकर, पिंटू धिरडे, सौरभ ठोंबरे, ओम सहारे, मयूर मस्कावार सा अनेक मान्यवर उपस्थित होते,