श्री प्रशांत ताराचंद रामटेके यांना पुरस्कार प्रदान .!

SST FAISHION च्या वतीने युवापत्रकार प्रशांत ताराचंद रामटेके यांना पुरस्कार प्रदान .!

बल्लारपुर (का.प्र.) : सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) या एका छोट्याश्या गावचे सुपुत्र प्रशांत रामटेके यांनी पत्रकारिता या क्षेत्रात पदार्पण करून स्वतः मेहनतीच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी असं कार्य करून पत्रकारिता क्षेत्रात नवलोकिक मिळवल.
चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक, लोकहितासाठी झटणारे, गोर गरिबांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे अन्यायच्या विरुद्ध उभे रहाणारे आणि वेळ प्रसगी समविचार भावनेतून प्रश्न सोडवणारे एक तडफदार व्यक्तिमत्व असलेले युवा पत्रकार प्रशांत ताराचंद रामटेके यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला.
अभिनेत्री, मॉडेल शिपा तेलंगे, अभिनेता अजय राठोड, मुंबई, अभिनेता प्रशांत तोतला, मुंबई या मान्यवरांच्या हस्ते प्रशांत रामटेके यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशांत रामटेके हे शून्यातून विश्व् निर्माण करणारे हाडाचे पत्रकार आहेत गरीब जनतेचे प्रश्न सोडवत, समाजसेवा,आणी साहित्य सेवा ही अतिशय सुंदर रित्या बजावतात, ज्या ठिकाणी घटना घडेल त्या ठिकाणी जाऊन जीवाची पर्वा न करता वार्तांकन करून लोकांपर्यंत वेगवेगळ्या घटना ची माहिती ते अनेक वर्षापासून करत आहेत . दिवस रात्र एक करून मेहनतीने स्वतःच्या जीवावर प्रबोधिनी न्युज चॅनेल त्यांनी सुरु करून आज जगभरात प्रसिद्धीसाठी त्यांचे चॅनेल आणि स्वतः ते सज्ज आहेत, अभिमान व आदर्श वाटावा असा प्रवासाचे पाईक असणारे, युवा पत्रकार प्रशांत रामटेके यांचे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातुन अभिनंदन होत आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील मान्य वरणंकडून अभिनंदन होत आहे. आणि ते कार्यरत असलेल्या सर्व ग्रामीण भागातील ग्रामस्ताकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".