एस.एस.टी फॅशन च्या वतीने मिस्टर, मिस, मिसेस, कीड्स ग्रँड फायनल कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न .!

बल्लारपुर (का.प्र.) : वर्धा २३ मार्च २०२५ रोजी वर्धा येथे एस.एस.टी. फॅशन मिस्टर, मिस, मिसेस, कीड, कार्यक्रम २३ मार्च रोजी हॉटेल विद्यादीप वर्धा येथे करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन गायक अनूप कुमार, अभिनेत्री मॉडल शिप्रा तेलंगे, अभिनेते अजय राठौड, अभिनेते, निर्माता प्रशांत तोतला, गायिका अश्विनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले.कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कलाकार, गायक, गायिका, अभिनेते, अभिनेत्री, मॉडेल, जज, पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.एस.एस.टी. फॅशन शो चे कार्यक्रमाचे आयोजक तथा अभिनेत्री, मॉडेल, शिप्रा तेलंगे वर्धा, अभिनेते अजय राठोड मुंबई, अभिनेता प्रशांत तोतला मुंबई यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले.


याप्रसंगी अभिनेत्री, मॉडेल शिप्रा तेलंगे अभिनेते अजय राठोड, अभिनेते प्रशांत तोतला, गायिका अश्विनी रोशन, सेलिब्रिटी (जज) प्रगती सिंह, मुख्य अतिथी भीमा शंभरकर, फिल्म निर्देशक विलास गाडगे, VIP Guest यशवंत भांडेकर, VIP Guest प्रशांत रामटेके चंद्रपूर, संजय चव्हाण, अकोला, किशोर राठोड, वाशिम, अश्विन बोन्दाडे, वर्धा, प्रताप मोरे, बुलढाणा, कनिका तैहल्यानी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुचिता गजभिये, नियोजन सलमान, सह. आयोजक शरद तेलंगे आणि सर्व SST FAISHION पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".