आगामी ईद उल अज़्हा २०२५ (बकरी ईद) निमित्त पोलिस स्टेशन रामनगर येथे बैठक संपन्न .!

चंद्रपूर (वि.प्र.) : चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात आगामी ईद उल अज़्हा २०२५ (बकरी ईद)निमित्त रामनगर पोलिस स्टेशन तर्फे रामनगर हद्दीतील सर्व मज्जित कमिटी पदाधिकारी मौलाना, शांतता समिती सदस्य, मुस्लिम प्रतिष्ठित,अन्य प्रतिष्ठित, यांची बैठक दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता पोलीस स्टेशन रामनगर परिसरात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
आगामी ईद उल अज़्हा (बकरी ईद) - २०२५ सणाच्या अनुषंगाने शासन प्रशासनाचे वतीने प्राप्त मार्गदर्शक सूचना तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा या दृष्टिकोनातून दिनांक ३०/०५/ २०२५ शुक्रवारी सकाळी 10.30 वा. पोलीस ठाणे रामनगर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, हे मात्र विशेष!
या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, व्ही. एच. पी. चे अध्यक्ष आर. एम. गहलोत, शांतता समिती सदस्य शालिनी भगत, पि.व्ही. मेश्राम, गुलाब पाटील, ताजुद्दीन शेख, मौलाना गुलाम नबी, मौलाना तहसीन रज़ा, मस्जिद कमिटी चे अब्दुल हमीद, शेख यूनुस, अब्दुल गफ्फार खान, एस एम मुस्तफा, मोहम्मद हफिजुर रहमान, मजीद खान, सय्यद यूनुस, नाहिद हुसैन, सिराज खान पठान, मोहम्मद जफर, सलीम खान तडवी, मौलाना मोहम्मद अजहर, शेख रउफ, सय्यद युसुफ, शफिक खान, मोहम्मद परवेज आलम, मोहम्मद शहबाज रजा, सय्यद अहमद, एजाज खान, अनवर हुसेन, विश्वास माधमशेट्टीवार, मिर्झा अनसार बेग, शेख शफी, सह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली यांनी या बैठकीत आगामी ईद उल अज़्हा निमित्त तीन दिवस साजरा होणाऱ्या या सणात चंद्रपूर शहर मनपाच्या वतीने सलग तीन दिवस पाणीपुरवठा करण्यात यावा अशी विनंती केली. नियमात बसणाऱ्या जनावरांची कुर्बानी करण्यात येईल व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समस्त मुस्लिम बांधवाकडून कोणाच्याही भावना दुखवण्यात येणार नाही अशी सर्व बांधवाकडून ग्वाही दिली. चंद्रपूर शहर मनपाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आवश्यक त्या सर्व सुविधा चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून उपलब्ध होणार असे विश्वास देखील या प्रसंगी व्यक्त केले.
तदनंतर रामनगर पोलीस स्टेशनचे आसिफ राजा यांनी सांगितले की आपण सर्व मिळून हा सण गुण्यागोविंदाने साजरा करूया! शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाचे सुद्धा तंतोतंत पालन होईल असे मला विश्वास आहे, व चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहावा यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे सांगत आपणास काही असुविधा निर्माण होत असेल तर आमच्यापर्यंत किंवा संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी. सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे किंवा काही आपत्तीजनक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर त्याची तक्रार करावी असे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या बैठकीला विशेष शाखेचे सुभाष शिडाम, दिनेश वाकडे, राजू अरवेल्लीवार, राजू चिताडे ही उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".