सेवा सहकारी बल्लारपूर तालुका a गट मधून डॉ अनिल वाढई यांची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये संचालक पदी अविरोध निवड .!
बल्लारपुर (का.प्र.) : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुक येणाऱ्या 10 जुलै ला होणार असून 21 संचालक निवडून येणार आहे. काल 11 जून रोजी फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होती .बल्लारपूर तालुक्यातील सेवा सहकारी गट मध्ये एकूण 7 सदस्य होते . डॉ अनिल वाढई यांचे एकमेव फॉर्म असल्याने दुसरे कोणताही उमेदवारांनी फॉर्म भरला नसल्याने डॉ अनिल वाढई हे अविरोध निवडून आले .अनिल वाढई हे दुसऱ्यांदा बँकेत निवडून आले. डॉ अनिल वाढई यांनी निवडणुकीत अविरोध निवडून आल्या बद्दल राजुरा चे माजी आमदार सुभाष भाऊ धोटे खासदार प्रतिभा ताई धानोरकर माजी विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार शिक्षक आमदार सुधाकर अडभाळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत माजी अध्यक्ष शेखर धोटे आणि नरेश मुंदडा यांचे आभार मानले . त्यांच्या अविरोध निवडून आल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती ची संचालक अलका अनिल वाढई रामभाऊ टोंगे घनश्याम मुलचंदानी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अब्दुल करीम माजी गट नेते देवेंद्र आर्य चंद्रकांत गुरु डॉ सुनील कुलदीवार डॉ अशोक घुंगुरुडकर रमेश राजुरकर घनश्याम उरकुडे डॉ युवराज भासरकर इस्माईल भाई यांनी अभिनंदन केले.