चंद्रपूर (वि.प्र.) : येथील पठाणपुरा वार्डातील रहिवासी प्रतिभा प्रभाकर दोमलवार यांचे शनिवार, 21 जून रोजी दुपारी 12 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा विजय, मुली आरती, कल्पना, स्वाती, दिपा व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.