योगामुळे भावनिक, मानसिकसह शारीरिक आरोग्य चांगले राखू शकतो - प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर
चंद्रपूर (वि.प्र.) : येथील सरदार पटेल महाविद्यालयात २१ जून रोजी 'जागतिक योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान योग ही भारताने जगाला दिलेली एक भेट आहे. आज संपूर्ण विश्वात योग दिन साजरा केला जात असून योगामुळे आपण आपले भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राखू शकतो असे प्रतिपादन सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी येथे बोलतांना केले. स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयातील शांताराम पोटदुखे सभागृहात जागतिक योग दिनानिमित्याने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना विभाग "मार्गदर्शन व योग प्रशिक्षण" शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, चंद्रपूर महिला पतंजली योग समितीच्या प्रतिभाताई रोकडे, आशा दूधपचारे, योग प्रशिक्षक जयश्री वानखेडे, कविता सावरकर, प्रतीक्षा धकाते, मेडिटेशन प्रशिक्षक प्रा. विजयालक्ष्मी पारिख, एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, रासेयो योजना प्रमुख डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. वंदना खनके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रसेयोचे स्वयंसेवक,एनसीसी कॅडेट, खेळाडू आणि विद्यार्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन योगासने केलीत. योग तज्ञानी योगासनांचे महत्त्व सांगून . पूरक हालचाली, प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने करण्यात आलीत. केंद्र सरकारतर्फे निश्चित केलेले शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. कुलदीप गोंड यांनी, तर आभार कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके यांनी मानले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्याची माहिती माधुरी कटकोजवार यांनी कळविली आहे.