भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिन साजरा..!
बल्लारपूर (का.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे भारतरत्न, मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती, डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार, प्रमुख अतिथी प्रा सौ. उज्वला वानखेडे मॅडम, प्रा. भीष्माचार्य बोरकुटे सर , प्रा. राकेश आवारी सर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. सौ. उज्वला वानखेडे यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर स्व लिखित लिखीत काव्य वाचन केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून अब्दुल कलाम यांच्या विविध कार्यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा दोडके मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण मत्ते सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. कमलाकर हवाईकर, प्रा. संगीता जक्कुलवार, प्रा प्रणिता बोकडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.