बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्र राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस ३० जुलै रोजी साजरा होतो. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध राज्यभर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. रविवारी (२७ जुलै) बल्लारपूर येथील ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी विसापुर (जि. चंद्रपूर) येथील मातोश्री वृद्धाश्रमात जेष्ठांसाठी अन्नदान व भेटवस्तू वितरणाच्या कार्यक्रमाने लोकसेवेच्या उपक्रमाची सुरूवात केली.
या कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांना जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. ते म्हणाले, 'समाजाच्या या आधारस्तंभांप्रती आपुलकी आणि सन्मान व्यक्त करण्याची संधी मिळाली, हे माझं खरोखरच भाग्य आहे. ज्येष्ठांच्या डोळ्यांतील प्रेम आणि आशिर्वादांनी मन गहिवरून आलं,' अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आ.मुनगंटीवार यांच्या ३० जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसाची सुरुवात समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहाशी नाते जडवत, अत्यंत भावनिक आणि सेवाभावी वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अमोल झाडे आणि त्यांच्या टीमतर्फे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अमोल झाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आमदार मुनगंटीवार यांनी विशेष अभिनंदन केले.याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल,शहराध्यक्ष रणंजय सिंग,ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल मोरे,अजय जयस्वाल, विद्याताई देवाळकर,अमोल झाडे, किशोर पंदीलवार, सतीश कनकम, सरिता कनकम, देवा वाटकर, पिंटू देऊळकर,किशोर मोहूर्ले, जयश्री मोहूर्ले, संदीप पोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस दरवर्षी जनसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित उपक्रमांनी साजरा होतो आणि तो एक सामाजिक सोहळा ठरतो. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंच्या मदतीसारख्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांच्या माध्यमातून राज्यभरात हा दिवस जनहितार्थ साजरा केला जातो. ही परंपरा त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धती, सामाजिक भान आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक ठरली आहे.
यावर्षीच्या जनसेवा महोत्सवाची सुरुवातच वृद्धाश्रमातील अन्नदानासारख्या भावनिक आणि मूल्याधिष्ठित उपक्रमाने झाली, ही गोष्ट अत्यंत आशादायक आणि प्रेरणादायी ठरली आहे, हे विशेष.