खेळाडूंना शूज व ट्रॅकसूट वाटप .!

ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत खेळाडूंना शूज व ट्रॅकसूट वाटप .!

नागपूर (वि.प्र.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या वतीने ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सुरू असलेल्या व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शूज व स्पोर्ट्स ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी क्रीडा अधिकारी श्रीमती माया दुबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक निखिल बोबडे, प्राचार्या श्रीमती अरुणा कडू, पर्यवेक्षक जे. बी. वांदे तसेच शिक्षकवृंद व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रशिक्षण केंद्रामार्फत मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून शालेय स्पर्धेत यश मिळवावे आणि शाळेचा व पालकांचा नावलौकिक वाढवावा.” प्राचार्या श्रीमती अरुणा कडू यांनी खेळाडूंसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरचे विशेष आभार मानले. या उपक्रमामुळे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंचा उत्साह वाढून त्यांना क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".