शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या नव्या अध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नियुक्तिने महिला वर्गात उत्साह .!
चंद्रपूर (वि.प्र.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष पदावर पक्षाच्या निष्ठावान नेत्या विद्यमान जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. बेबीताई उईके यांची नियुक्ती थेट पक्ष प्रदेशाध्यक्षांनी अलीकडेच केल्यामुळे महिला वर्गात आनंद व्यक्त केल्या जात असून स्वागत करण्यासाठी सर्व क्षेत्रातील महिलांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. काल बेबीताई उईके यांच्या निवासस्थानी स्वागत व अभिनंदन करणाऱ्यात महाविकास आघाडी व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या सौ. रेखाताई बारसागडे, पूजा शेरकी, रेखा जाधव, प्रज्ञा पाटील यांच्यासह असंख्य पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. अलीकडेच मनपा निवडणुका होणार असल्याचे संकेत व महिलांना ५०% आरक्षण असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सौ.बेबीताई उईके यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीला राजकीय वर्तुळात फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.