कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार .!

महसूल दिनाचे औचित्य साधून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार .!
बल्लारपुर (का.प्र.) : दि.1ऑगस्ट ते 7 ऑगस्ट,2025 या कालावधीमध्ये महसूल विभागाकडून " महसूल सप्ताह "साजरा करण्यात येत असून बल्लारपूर  तहसील कार्यालयामध्ये वर्षभरात सर्वोत्कृष्ट कर्तव्य व जबाबदारी पार पाडणारे कर्मचार्यांना दि.1 ऑगस्ट या महसूल दिनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संगायो लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी आदेश देण्यात आले, गरजू नागरीकांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये श्रीमती.रेणुका कोकाटे तहसिलदार बल्लाररपूर, उपअधीक्षक,भूमी अभिलेख श्री.अनिल देशमुख, नायब तहसिलदार श्री.महेंद्र फुलझेले व अजय मलेलवर, श्रीमती.नंदा बाबरे निरीक्षण अधिकारी प्राजक्ता सोमलकर व इतर कार्यालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".