बल्लारपूर (का.प्र.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मिळालेल्या सूचनेनुसार, राज्य सरकारने लागू केलेले "महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४" असंवैधानिक आणि लोकशाहीला हानिकारक आहे.आणि लोकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.
म्हणून काँग्रेस पक्ष, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) आणि सर्व कम्युनिस्ट पक्ष तर्फ़े बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी नगर परिषद चौकात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सार्वजनिक सुरक्षा विधेयकाविरुद्ध निदर्शने करन्यात येनार आहे.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष काँग्रेस पक्ष, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) आणि सर्व कम्युनिस्ट पक्षचे सर्व आघाडी व सेलच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन देवेंद्र सत्यदेव आर्य अध्यक्ष शहर काँग्रेस कमेटी , प्रकाश पाठक तालुका प्रमुख शिवसेना आणि बादल उराडे द्वारे करण्यात आलेला आहे.