दोषी अधिका-यांवर तात्काळ कार्यवाही करा .!

वनभूमीधारकांच्या शेतजमिनीवर बळजबरीने जेसिबीद्वारे सभोवताल नाली, गड्ढे व तारेने वॉलकम्पाऊंड करण्या-या दोषी अधिका-यांवर तात्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाईचे आश्वासन..!
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जवळपास तीन वर्षापासून प्रशासन, वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकाकी झुंजीला यश..!
बल्लारपुर (का.प्र.) : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ ची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शा. प. क्र. वहका-२०२१/प्र.क्र.५०/का-१४ दि. ०३ मार्च २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदिवासी व इतर वनभूमीधारकांचे प्रलंबित वनहक्क दावे तात्काळ निकाली काढून त्यांना वन प्रमाणपत्र वाटप करित दावे मंजूर केलेल्या जमिनीची मोजणी करुन ७/१२ उतारे देवून त्यांच्या कुटुंबाचे उपजिवीकेचे साधन उपलब्ध करण्यात येवून बनहक्क दावे प्रलंबित असतांना देखील जवळपास तीन वर्षापासून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बळजबरी करुन जेसिबीद्वारे शेतजमीनी सभोवताल नाली, गड्ढे व तारेचे वॉलकम्पाऊंड करुन जमीनमध्ये फळझाडे लावून पिक घेण्यास मनाई केल्यामुळे वनभूमीधारकांवर उपासमारी पाळी आली असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात उप-वनसंरक्षक लेफ्टनंट कुशाग्र पाठक यांची शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी भेट घेवून चर्चा केली असता ज्या ज्या वनभूमीधारकांच्या शेतजमिनीवर बळजबरीने जेसिबीद्वारे सभोवताल नाली, गड्ढे व तारेने वॉलकम्पाऊंड करण्यात आले त्या वनभूमीधारकांची संपूर्ण माहिती दिल्यास सबंधीत दोषी अधिका-यांवर तात्काळ कार्यवाही आणि वनभूमिधारकांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया करण्याचे आश्वासन देण्यात आले.
अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपारिक वननिवासी यांना स्वतःच्या उपजीविकेकरिता शेती कसण्यासाठी वनजमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क, निस्तारासारखे हक्क, गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरीत्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करून त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे. यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादने, चराई करणे, पारंपारिक मोसमी साधनसंपत्ती मिळविण्यास हक्कदार असणे, निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरीत्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्रोताचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क इ. विविध वनहक्क प्राप्त असून देखील वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही? अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपारिक वननिवासींचे प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढून त्यांना वन प्रमाणपत्र वाटप करित दावे मंजूर केलेल्या जमिनीची मोजणी करुन ७/१२ उतारे देवुन त्यांच्या कुटुंबाचे उपजिवीकेचे साधन उपलब्ध देण्यात येवून अन्याय करणाऱ्या जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री यांना सुद्धा निवेदनातून वारंवार केलेली आहे. तरी देखील सदर विषयाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असून प्रशासन मात्र सदर विषयाची दखल घेत नसल्याचे निदर्शात येत असल्यामुळे उप-वनसंरक्षक लेफ्टनंट कुशाग्र पाठक यांची शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी भेट घेवून चर्चा केली असता ज्या ज्या वनभूमीधारकांच्या शेतजमिनीवर बळजबरीने जेसिबीद्वारे सभोवताल नाली, गड्ढे व तारेने वॉलकम्पाऊंड करण्यात आले त्या वनभूमीधारकांची संपूर्ण माहिती दिल्यास सबंधीत दोषी अधिका-यांवर तात्काळ कार्यवाही आणि वनभूमिधारकांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".