बल्लारपूर (का.प्र.) : श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर बामणी द्वारे आयोजित सावित्री जिजाऊ दशरथोत्सव सोहळ्यानिमित्त, बल्लारपूर शहरातील नगराध्यक्ष व नगरसेविका यांचा भव्य सत्कार दि.12 जानेवारी 2026 ला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या 427 वी जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती ,स्वामी विवेकानंद यांचे 162 व्या जयंती प्रित्यर्थ, संत तुकाराम महाराज सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पि यु जरीले होते, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.रजनीताई हजारे होत्या. मार्गदर्शक म्हणून बल्हारपूर तालुक्याच्या तहसीलदार मा. रेणुका कोकाटे होत्या. त्यांनी उपस्थिताना अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रमुख एड. दीपक चटक अधिवक्ता उच्चन्यायालय नागपूर यांनी जिजाऊ सावित्री आणि स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर प्रकाश टाकला .प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माननीय डॉ. अलकाताई वाढई सीडीसीसी बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई, जीएमसी कॉलेजच्या सीनियर डॉ.कु. श्रुतिका पावडे व मंडळाचे उपाध्यक्ष मा. मार्कंडेय बोंडे यांनी सर्वांनी मार्गदर्शन केले तसेच बल्लारपूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. बल्लारपूर शहराला स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला भरपूर समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णाताई कष्टी यांनी केले ,प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रा.राजेंद्र खाडे यांनी केले ,आभार प्रदर्शन श्रीमती माधुरी खुटेमाटे यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती कमलताई वडस्कर,विनायकराव साळवे, मनोहर माडेकर, गजानन घुगुल,श्यामसुंदर धांडे,युवराज बोबडे ,,किसनराव पोडे भास्कर वडस्कर तसेच महिला आघाडीच्या वंदना पोटे, किरण बोबडे,सुवर्णा कष्टी,सोनाली काकडे व युवा आघाडीचे विवेक खुटेमाटे ,अतुल बांदुरकर ,बालाजी भोंगळे कुणाल ,कौरासे,सुमित कौरासे यांनी अथक परिश्रम घेतले.
