पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव . . जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेनेच्या माध्यमातून साजरी होणार जयंती . . पुरस्कारासाठी 28 मार्चपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन .!
अहिल्यानगर (वि.प्र.) - जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेना अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी दिली आहे.
या जयंती उत्सवानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. समाजकारण आणि लोककल्याणाच्या कार्याला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’, ‘युवा गौरव पुरस्कार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार’, ‘रणरागिणी पुरस्कार’, ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार’, ‘महाराष्ट्र भूषण’ तसेच ‘समाज भूषण’ असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह व मानपत्र असे असणार आहे.
समाजातील कार्यकर्ते, संस्था, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योग्य उमेदवारांचे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी संबंधित व्यक्तीची माहिती, कार्याचा तपशील आणि आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार करून दि. 28 मार्चपर्यंत 8805922960 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावीत, असे सांगण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाची नेमकी तारीख व कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देत त्यांच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
