मराठी भाषा गौरव दिन सोहळा संपन्न .!

नागपुर (वि.प्र.) : लोकमान्य जनकल्याण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे आज मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडी ने करण्यात आला.विद्यार्थ्यांनी साहित्यिकांच्या वेशभूषेत कुसुमाग्रज, सुरेश भट, बहीणाबाई यांच्या काव्यरचना आणि एकपात्री प्रयोग सादर केले. महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे लेझीम नृत्य सादर केले प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रभाकर तांडेकर, प्राचार्या अरुणा कडू, पर्यवेक्षक श्री वांढे आणि श्री चोपडे सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाने उंची गाठली. सौ मेंढेकर यांनी संचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".