इंजी. राकेश सोमानी यांची बल्लारपूर व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड .!

बल्लारपूर (का.प्र.) : बल्लारपूर व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी इंजी. राकेश सोमानी यांची निवड करण्यात आली आहे. इंजी. राकेश सोमानी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून सामाजिक, राजकीय तसेच व्यापारी क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
व्यापारी बांधवांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न संबंधित प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, व्यापाऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणे तसेच बल्लारपूर शहरातील व्यापारी क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष इंजी. राकेश सोमानी यांनी व्यक्त केला.
व्यापारी मंडळाच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच व्यापारी वर्गाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचे त्यांनी सांगितले.
इंजी. राकेश सोमानी यांच्या निवडीबद्दल व्यापारी बांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".