भद्रावती येथे 'सायबर सुरक्षा आणि पोक्सो' विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न . . रोटरी क्लब भद्रावती तसेच इनरव्हील क्लब (ब्लाॅसम) यांचा संयुक्त उपक्रम . . विद्यार्थी, पालकांची भरगच्च उपस्थिती ..!
भद्रावती (वि.प्र.) : रोटरी क्लब ऑफ भद्रावती, इनरव्हील क्लब ऑफ भद्रावती ब्लॉसम आणि चंद्रपूर पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती येथील राजमणी गार्डन येथे 'STEPS' (सुरक्षा, विश्वास, शिक्षण, संरक्षण आणि मर्यादा) या संकल्पनेअंतर्गत 'सायबर सुरक्षा आणि पोक्सो (POCSO)' या विषयावर भव्य जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री सुनील गाडे साहेब, डॉ प्रकाश महाकाळकर बीईओ भद्रावती, एपीआय प्रज्ञा वाडेकर भरोसा सेल चंद्रपूर, कार्तिक खनके सायबर सेल हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
सुनील गाडे यांनी उपस्थितांना सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची मदत कशी घ्यावी, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. एपीआय प्रज्ञा वाडेकर यांनी बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (POCSO) आणि इंटरनेटच्या सुरक्षित वापराविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. बालकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ प्रकाश महाकाळकर बीईओ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस विभागाकडून तयार करण्यात आलेली सुरक्षा मंत्र ही माहितीपर पुस्तिका उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ भद्रावतीचे अध्यक्ष सुधीर पारधी, सचिव सुरेंद्र राऊत, कोषाध्यक्ष महेंद्र गावंडे, प्रोजेक्ट सचिव प्रकाश पिंपळकर, पास्ट प्रेसिडेंट आणि प्रोजेक्ट डायरेक्टर अनिल धानोरकर व डॉ. माला प्रेमचंद, युवराज धानोरकर, तसेच इनरव्हील क्लब ऑफ भद्रावती ब्लॉसमच्या अध्यक्षा वर्षा धानोरकर, सचिव स्वाती चारी, कोषाध्यक्ष स्वरूपा पाटील आणि प्रोजेक्ट डायरेक्टर्स तृप्ती हिरादेवे, शुभांगी बोरकुटे व प्रियंका कुंभारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.
या जनजागृती कार्यशाळेला रोटरी क्लब भद्रावतीचे सदस्य डॉ ज्ञानेश हटवार सर, किशोर भोस्कर, किशोर खंडाळकर, विक्रांत बिसेन, आत्माराम देशमुख, रुखसाना शेख, दिलीप राम, मनोहर नागपुरे, मेजर मारुती महातळे, सुनिता खंडाळकर तसेच इनरव्हील ब्लॉसमच्या सदस्या कविता सुफी, मनिषा उचाडे, प्रतिभा मानकर, यांच्या सह महिला पोलिस, नागरिकांचा, पालकांचा आणि तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
