भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य वानखेडे यांनी डॉक्टर आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीत मानवी जीवनाच्या उत्थानासाठी व भारताला आकार देण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती केली ,असे मनोगत व्यक्त केले. तसेच डॉक्टर सुधिर मोते व सतीश नंदनवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नरेश जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश आसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले .कार्यक्रमाला समस्त शिक्षक, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.