अशोभनीय राजकीय महानाट्य..!

जळगांव (वि.प्र.) - महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत, पुरोगामी विचारांचा वारसा असलेलं राज्य.वेळप्रसंगी राष्ट्राला दिशा देणारा महाराष्ट्र. राष्ट्रात राहणारा महाराष्ट्र मागील काही दिवसांपासून राज्यकर्ते म्हणून लायक नसलेल्या लोकांनी वेठबिगार केला.येणाऱ्या पिढीला कोणता आदर्श ही मंडळी ठेवत आहेत.आज बिहारी सुद्धा या राज्यावर फिदीफिदी हसत असतील.एवढा बावळटपणा धर्माच्या नावाने मस्जिद,हनुमान चालींसा, भोंगे ह्यावरून सुरू आहे. माझ्या वाचक मित्रांनो! मुळात राजकीय आपण कोणाचे समर्थक आहात तो तुमचा अधिकारच आहे.मात्र,आपले राज्यकर्ते लायक आहेत का? हा प्रश्न अराजकीय होऊन स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.आज समस्येवर कोणीच बोलत नाही.मुख्यतः ह्यांना लोकांचे लक्ष जीवन मरणाच्या समस्या वरून हटवायचे आहे.ह्याच करिता हे सर्व नाट्य सुरू आहेत.अमरावती वरून नवरा-बायकोचा पक्ष असलेले राणा दाम्पत्य मुंबईत येऊन धिंगाणा घालतात,ह्यांना पाठबळ कुणाचं.ह्यांचा मतदारसंघ सोडून हनुमान चालींसा मातोश्री समोर जाऊन वाचण्याची कोणती निकळ आली होती.किराणा वाटून निवडून येणारे लोकप्रतिनिधी ह्यांची बौद्धिक पातळी ही नाटकीयच असू शकते.मुळात आज गॅस चे दर हजार रुपये झाले.स्वयंपाक घरात जाऊन विचारा काय चिडचिड होतेय ती,पेट्रोल-डिझालं भरायला पंपावर गेले की कळतं किती अच्छे दिन आहेत.मागील 8 वर्षात देश आर्थिक बुडीत घातला,दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाहीत.उलटपक्षी आपल्या भांडवलदारांच्या घशात मैत्री करिता देशाची गंगाजळी बुडविली.त्यात महाराष्ट्र राज्यसरखं सोन्याची अंडी देणारं राज्य आपल्या हातून शब्द न पाळल्याने निसटले. त्याचा राग जाता जात नसल्याने व राज्यात व्यवस्थित कार्यभार करू न देता.असे दंगे भडकवून जनतेची माथी आगीत भाजत या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे षडयंत्र सध्या जोर धरत आहे.बेरोजगार युवक ह्यांच्या हाताला देश प्रगत करण्याकरिता काम द्यावे लागते.इथे मात्र देश बरबाद करण्यासठी युवकांच्या हातात दगळ दिला जात आहे.रक्तरंजित राजकारण कधीही देशाला प्रगत करू शकणार नाही.सध्या मुस्लिमांच्या आडून भांडवलशाही वाढवून सर्व काही खाजगीकरण करीत ओबीसी, एस सी,एस टी ह्यांचे आरक्षण संपविण्याचे खरे कार्य सुरू आहे.विशेषतः ह्या करण्याकरिता वापरण्यात येणारी जमात सुद्धा ह्याच वर्गातील म्हणजे काट्याने काटा कसा काढावा हे या संघाच्या काळ्या टोपीखालील सडका मेंदू होय. माझ्या बहुजन वर्गातील सर्व नवतरुण मित्रांना आवाहन आहे.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हा.स्वयंरोजगार निवडा आपल्या आई-वडिलांनी मोठ्या कष्ठाने तुम्हाला मोठं केलेलं आहे.त्यांची पुढील जवाबदारी तुमच्यावर आहे.म्हातारपणी त्यांची काठी तुम्हीच आहात. त्यामुळे कोणत्याही राजकीय लोकांच्या धार्मिक भावनेला बळी पडू नका.विकासाची भाषा करणाऱ्या राजकीय व्यक्ती सोबत रहा.जो रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल.कष्टकरी,शेतकरी,शेत मजूर,कामगार ग्रामीण-शहरी भागातील नावतारुणांना काम देईल अश्या राजकीय विचारानेच चला.महागाईच्या खाईत देश डुबकी मरत आहे,फक्त फरक एवढाच ज्याच्या नाकातोंडात आधी पाणी जातं त्यालाच प्रथमतः कळतं.

विजय विमल सहदेवराव पोहनकर - जळगांव (जामोद)

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.