जळगांव (वि.प्र.) - लोकशाही मध्ये जनतेला न्याय मागण्याकरिता निवेदन, आंदोलन करणे ही एक न्याय प्रथा आहे.आपल्या मागण्यांसाठी कामगार कष्टकरी जनता,शेतकरी कर्मचारी तर कधी अधिकारी सुद्धा आंदोलने करीत असतात.गिरणी कामगारांचा संप,शिक्षकांचा संप हे आज पर्यंतच्या इतिहासातील नोंदी आहेत.आता नवा इतिहास एसटी कामगारांनी नोंदविला. लोकशाहीचा मार्गच खूप वेगळा आहे.त्यात मागण्या मान्य करून घेतांना संयम बाळगणे अनिवार्य असते.तर अशिक्षित कामगार सांभाळताना आंदोलन,संप चिघळणार नाही ह्याची डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागते.अन्यथा असामाजिक तत्वे तुमचा संप,आंदोलन चिघळविण्यात अहोरात्र मेहनत घेत असतात.असो! एक चुकीचा डॉ तुमचे जीवन संपवू शकतो.चुकीचा वकील आयुष्य बरबाद करू शकतो,चुकीचा शिक्षक पिढ्या बरबाद करतो,तर चुकीचा राजकारणी देश नेस्तनाबूत करतो.( हिटलर ने जर्मनी,जेलसकी ने युक्रेन,पुतीन ने रशिया) ह्याच प्रमाणे सदावर्ते ह्या गुणांची खान की घाण असलेल्या माणसाने आपली वकिली सोडून कामगार नेतृत्व (चुकीच्या पद्धतीने) केल्याने लाखो एसटी कामगार बरबाद झाले,काही जीवन संपविते झाले तर बाकी आर्थिक-मानसीक- शारीरिक कमजोर झालेत.एसटी संप टिकावा त्यांना न्याय मिळावा हे आम्हाला सुद्धा मान्य होते.परंतु,कुठे थांबले पाहिजे हे जेव्हा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला कळत नाही. तेव्हा तेव्हा कामगार देशोधडीला लागलेला आम्ही बघत आलो आहे,बघत आहोत. ५७ दिवस चाललेला शिक्षकांचा संप तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांनी मोडीत काढला होता.गिरणी कामगारांच्या संपाचे वाटोळे झाले.आता एसटी संपात आर्थिक मागास असलेला हा अलुतेदार-बलुतेदार, अठरा पगळ जातीतील कामगारांचा संप सदावर्ते ह्या माणसाने तुटेपर्यंत घेउन जात.कामगारांचे वाटोळे केले.लोकशाही मध्ये समजा 10 मागण्या असतात त्यातील 4 मान्य झाल्या की त्या खिशात घालीत संप मोडीत काढावा लागतो.पुढील मागण्यांसाठी पुन्हा काही काळाने आंदोलन निवेदन हा मार्ग निवडत आंदोलन जिवंत ठेवत राहावे लागते.हीच खरी पद्धत आहे.मात्र,वाचक मित्रांनो! एसटी महामंडळ चा संप हा एक मोठं षडयंत्र होते. १९९५ पासून युती शासनाच्या काळापासून एसटी ही शिवसेनेची प्रिय आहे. स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी सर्व बसेस ला भगवा रंगाचा पट्टा लावून एक वेगळी ओळख एसटी ची केली होती.प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार असलेले हे महामंडळ व त्याची अब्जो रुपयांची मालमत्ता ह्यावर डोळा असलेल्या लोकांनी एसटी संप चिघडविला.त्यात नुकसान हे कामगारांच्या सोबत ग्रामीण भागातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक,सामान्य जनतेचे झाले.ज्या दिवसाला माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडवळकर ह्यांनी नामदार अनिल परब ह्यांच्या सोबत मुख्य बैठक घेऊन पगार व इतर मागण्या मान्य करून घेतल्या होत्या त्याच दिवसाला हा संप संपुष्टात येणे गरजेचे होते.योग्य होते.बाकी एसटी विलीनीकरण ह्या मागणी साठी लढा कामावर हजर राहून तेवत ठेवता आला असता.मात्र,सदावर्ते ह्या वकिलांने फाजील आत्मविश्वास कामगारांच्या उरात भरत त्यांचे वाटोळे केले, आता जेलवारी करीत बसला. एसटी कामगारांचे आर्थिक नुकसान न भरून निघणारे आहे.ह्यावर मानविद्रुष्टीकोण ठेवत सहानुभूती पूर्वक शासनाने लक्ष द्यावे.ज्यांचे जीव या आंदोलनात गेले त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून त्यांना आर्थिक मदत देत त्यांच्या परिवाराचे सांतावन शासनाने करणे गरजेचे आहे.कोणत्याही अटी न ठेवता कामगारांच भल बघत त्यांना कामावर रुजू करून घ्यावे.तरच शासनकर्त्या जमातीचे भले होईल.अन्यथा हाच कामगार मतदान पेटीतून आपले म्हणणे अन्याय ह्यावर बोलेल,पेटून उठेल.
विजय विमल सहदेवराव पोहनकर - जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ)