भद्रावती (ता.प्र.) - लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील भौतिक शास्त्र विषयाचे अध्यापक आशिष बबनराव अकोजवार यांना नुकतीच गोंडवाना विद्यापीठातर्फे आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. " सिंथेसिस ऑफ ई यु 2 अधिक अँड सीई 3 ऍक्टिव्हेटड फास्फेट फास्फोर फोर व्हाईट लाईट एमीटिंग डायोड ॲप्लिकेशन "हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. मार्गदर्शक म्हणून नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी चे प्राचार्य डॉक्टर नामदेव कोकोडे तर सह मार्गदर्शक नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती चे प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या संशोधन कार्यात आतापर्यंत 10 शोध निबंध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध पत्रिकेत प्रकाशित केले आहे .तसेच दिनांक 3 ऑक्टोबर 2021 ला या विषयातील एका घटकावर एक पेटंट रजिस्टर केले आहे. यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे .त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील ,मार्गदर्शक डॉक्टर कोकोडे सर, डॉक्टर कार्तिक शिंदे सर, तसेच सहकारी मित्रांना दिले आहे.