चंद्रपुर (वि.प्र.) - कोणत्याही क्षेत्रातील खेळाडू कलावंत हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या उत्तमोत्तम कामगिरी बद्दल त्यांचा आदर-सत्कार व्हावा व येणाऱ्या मागच्या पिढीला त्यांचा आदर्श घेता यावा, प्रेरणा घेता यावी म्हणून त्यांचा मान-सम्मान होणे गरजेचे आहे. जिल्हा कुस्तीगीर संघ चंद्रपूर जिल्हा व खेळाडू शुभचिंतक संघ चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च,१ व २ एप्रिल ला देवळी,वर्धा येथे झालेल्या विदर्भ स्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा मध्ये कु. तनु मुकेश जाधव हिने ५९ किलो वजनगटात सुवर्णपदक, कु. सुचिता रविंद्र ठेंगरे हिने ६३ किलो वजनगटात ब्रोन्झ पदक आणि जयंत विलासराव समर्थ ह्यांनी ५४ किलो वजनगटात ब्रोन्झ पदक पटकाविले आहे. त्यासबंधाने आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हा महानगर संघटनमंत्री श्री सुनील रत्नाकर भोयर आणि विदर्भ केसरी श्री भैय्याजी (बापूजी) अवघडे यांचेकडून सुवर्णपदक विजेतीस १२ महिनेपर्यंत प्रति महिना १,००० रुपये 'स्कॉलरशिप' देण्यात आली. तसेच ब्रोन्झ पदक विजेत्यास जि.कु.संघ उपाध्यक्ष श्री राजेश सोलापन व श्री चंद्रशेखर पडगेलवर जि.कु.संघ चंद्रपूर यांचेकडून प्रति महिना ५०० रुपये १२ महिन्यापर्यंत स्कॉलरशिप देण्यात आली. तसेच डॉ. शिशिर वंजारी ब्रम्हपुरी यांचे तर्फे सर्व पदकप्राप्त विद्यार्थ्यांना रुपये ७५०० विभागून सम्मान राशी सुद्धा देण्यात आली. तसेच सर्व पदक प्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकां सकट गुरुजनांचा सत्कार सुद्धा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री शरदराव टेकुलवार, सचिव श्री छगणराव पडगेलवर, सदस्य श्री गजाननराव क्षीरसागर, बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव श्री सुभाषजी लांजेकर, पंच श्री विलासराव देशियावाले, श्री मुरलीधरजी टेकुलवार, म.प्रतिनिधी जि. कु.संघ चंद्रपूर तसेच श्री नरेंद्र गाडगिलवार ब्रम्हपुरी कु.संघ प्रशिक्षक श्री विनोद दिवटे साहेब, श्री आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर, उत्कृष्ट जलतरणपटू ऍड.मालवी सर यांचे हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनील रत्नाकर भोयर यांनी केले. कार्यक्रमात संपूर्ण सूत्रसंचालन कु.कविता घोरमोडे आणि आभार प्रदर्शन श्री अमोल ठेंगडी यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वीसाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कुस्तीगीरांची खेळाडू प्रशिक्षण देणाऱ्यांची मदत काही राजकिय पुढाऱ्यांची सुद्धा मदत लाभली कार्यक्रमात सर्वात शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.