नागपुर (प्रा.राहुल गौर) - महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीय तेढ कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष सतत प्रयत्न करीत आहे. राज ठाकरे आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे.दोन दिवसापूर्वी रवी राना व नवनीत राणा यांनी तोच प्रयत्न केला. मस्जिदिवरील भोंगे काढण्याचा व हनुमान चालिसा वाचण्याचा प्रश्न आताच पुढे का आला?व या साठी एवढा अट्टहास का?महाराष्ट्रात पाच वर्ष भाजपचे सरकार होते तेव्हा राज ठाकरे ला मस्जिद वरचे भोंगे काढण्याचं का सुचलं नाही? तेव्हा तर ते जाहीर सभेत मोदीला शिव्या देत होते. सर्वांत मोठा फोकनाड म्हणत होते. लाव रे तो व्हिडीओ म्हणुन त्यांच्या खोटारडेपणाचा पाढा वाचत होते. आता एकदम यू-टर्न कसा घेतला. राज साहेब महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले काय? पेट्रोलचे भाव एकशे वीस रुपयांच्या पुढे गेले आहेत. सिलेंडरचे भाव हजारच्या वर गेले, दररोज महागाई वाढत आहे.वाढत्या महागाईमुळे या देशातील जनता त्रस्त आहे. बरोजगरी वाढली आहे?सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण सुरू आहे. महागाईवर केंद्र सरकारचे अजिबात नियंत्रण नाही.राज ठाकरेंना हे प्रश्न का दिसत नाही? राज ठाकरे कधीच अश्या प्रश्नावर बोलत नाही?. जनतेच्या जीवनाशी निगडित प्रश्न राज ठाकरेला कधी दिसलेच नाही. भोंगे हटाव, हनुमान चालिसा, मराठी पाट्या लावा, उत्तरभरतीय भगाव, अयोध्या चलो असे फालतू विषय घेऊन राज ठाकरे म्हराष्ट्रातील तरुणांनाचे माथे भडकवत आहे.जेव्हा १६ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली तेंव्हा महराष्ट्रातील जनता मोठया आशेने त्यांचेकडे पहात होती. राज ठाकरे महाराष्ट्रात नक्की परिवर्तन घडविणार असं प्रत्येकालाच वाटायचं परंतु त्यांनी जनतेची घोर निराशा केली पक्ष वाढण्याऐवजी संपला महराष्ट्रातील जनता राज ठाकरे मध्ये बाळासाहेब शोधत होते.राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे, बाळासाहेबा सारखी वक्तृत्व कला आहे. लोक सभेला गर्दी करतात परंतु ते जनसामान्यांच्या प्रश्नाला कधीच हात घालत नाही. त्यांचं कार्यक्षेत्रही मर्यादीत आहे मुबंई, पुणे, नाशिक, ठाणे औरंगाबाद, या पलीकडे ते विचार करीत नाही. विदर्भात तर कधी भटकतच नाही त्यामुळे इकडे मनसे शून्य आहे. ते नेहमी चुकीचा विषय घेऊन आंदोलन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन केलं असतं तर म्हराष्ट्रातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं असतं परंतु इथेच त्यांचं चुकल याच कारणामुळे ७ वर्षात अरविंद केजरीवाल ला जे जमलं ते 16 वर्षात राज ठाकरेला जमलं नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती झाली व त्यांच्या पक्षाच्या उमदेवराला कुणी निवडूनही देत नाही. फक्त मनोरंजन म्हणून लोकं त्यांच्या सभेला गर्दी करतात. तरुण पिढी कसलाही विचार न करता अश्या चिथावणीखोर भाषणाला बळी पडत आहे. बरं यांचे कार्यकर्ते कोण आहेत, कुणी गुजराती, मारवाडी, सिंधी तसेच उच्चवर्णीय मराठी समाजाचे मुलं यांचे कार्यकर्ते नाही ते या भानगडीत कधीच पडत नाही. या आंदोलनात फक्त बहुजन,ओबीसी, मराठा, आदिवासी,भटके विमुक्त समाजाचे मुलंच तुम्हाला दिसतील कारण हेच बेरोजगार आहेत. यांना कोणतेही काम नाही. आणि ही बेरोजगाराची फौज अशा फालतू कामात राज ठाकरे किंवा इतर संघटनांचे नेते वापरून घेत आहे. अश्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुण मुलांना आपल्या भविष्याची काळजी नाही, रोजगार कसा मिळेल या कडे लक्ष नाही. परंतु अश्या फालतू आंदोलनात आपल्या आयुष्याचा अमुल्य वेळ खर्ची घालतात. हे शेवटपर्यंत सतरंजी उचलणारे कार्यकर्तेच असतात कधी नेते बनत नाही. यांचा फक्त आंदोलनात वापर केला जातो.राज ठाकरे एवढया गर्दीत कोणाला ओळखत सुद्धा नाही, कुणाच्या सुखदुःखात कधी सहभागीही होत नाही तरी ते त्यांच्यासाठी धावून जातात हे आमच्या मुलांना केव्हा कळेल! राज ठाकरेच्या किंवा अश्या नेत्यांच्या मागे लागून आपला बेरोजगारीचा प्रश्न सुटेल का? आपला पोटापाण्याचा प्रश्न सुटेल का? आपले भविष्य उज्वल होईल का? याचा विचार कोणीच करत नाही फक्त राज ठाकरे साहेबांनी आवाज दिला की मागे धावयाचे प्रत्येक आंदोलक युवकाने सद्सद्विवेक बुद्धीने याचा विचार करायला पाहिजे. आपलं हित कशात आहे याचा प्रथम विचार करायला पाहिजे. सध्या जे काही आंदोलनं सुरू आहे हे जनतेच्या प्रश्नावर आहे का?त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न सुटतील का? कि विनाकारण स्टंटबाजी दोन धर्मात तेढ निर्माण करण महाराष्ट्रातली शांतता भंग करणे अशा पद्धतीचे हे आंदोलन असेल तर अश्या आंदोलनापासून चार हात दूरच राहिले पाहिजे. हनुमान चालीसा वाचल्यामुळे किंवा अयोध्येला गेल्यामुळे आपले प्रश्न सुटतील का? महागाईच्या विरोधात कोणी चकार शब्द बोलायला तयार नाही. केंद्र सरकार महागाईच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भटकवीत आहे. हिंदू-मुस्लीम वाद हा भाजपचा आवडता विषय आहे.दोन धर्मात झगडे लाऊन द्यायचे व दुरून तमाशे पहायचे.यात मरतील कोण तर बहुजन समाजाचे लोकं.उच्चवर्णीय लोकांना धक्का लागत नाही. ते फक्त खिडकीतुन तमाशा पाहतात याचा आपण का विचार करत नाही?
धार्मीक व जातीय तेढ कसं निर्माण होईल असे विवादात्मक मुद्दे मीडिया उपस्थित करत आहे.अश्या प्रश्नांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न मीडियाकडून सतत होतो आहे.मीडिया सुद्धा आता पहिल्यासारखा राहिला नाही पत्रकारिता हा लोकशीचा चौथा आधारस्तत आहे तो पार ढासळला आहे विकल्या गेल्या आहे. जनतेच्या प्रश्नावर कोणत्याच चॅनलवर चर्चा होताना दिसत नाही. महागाई, पेट्रोल, डीझेल दरवाढ,बेरोजगारी या विषयावर मीडियावर एकही बातमी दाखविली जात नाही. व चर्चाही होत नाही. फक्त धार्मिक व जातीय तेढ कशी निर्माण होईल अशाच बातम्या सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखविल्या जात आहे. या देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून इलेक्ट्रॉनिक मिडियाचा वापर याच पद्धतीने सुरू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहजे आपल्या पक्षाचे सरकार म्हराष्ट्रात आले नाही म्हणुन कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला त्रास द्यायचे हे बरोबर नाही कोण खर कोण खोट हे म्हराष्ट्रातील जनेताल चांगलं कळते. म्हराष्ट्रातील जनता तेवढी सुज्ञ आहे. हा राजकिय गोंधळ ही स्टंटबाजी आता थांबली पाहीजे या नौटंकीला म्हराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे.यामुळे म्हराष्ट्राचा विकास खोळंबला आहे. तूर्तास एवढंच. सध्या महाराष्ट्रात व देशात जे काही सुरू आहे त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करणे हा माझा उद्देश नाही किंवा मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. परंतु ज्या गोष्टी आज घडत आहे त्या बुद्धीला न पटण्यासारखे आहे म्हणून हा पत्रप्रपंच..!
सी. एम. लोणारे (मुख्य संपादक) भोई गौरव मासिक - 9960014116