बल्लारपुर (का.प्र.) - नागपुरच्या धंतोली परिसरात धक्कादायक प्रकार ! वृध्द आईचा खून करून इंजिनियर असलेल्या मुलाने नैराश्यातुन आत्महत्या केल्याची घटनेने संपूर्ण परिसर हादरला. सविस्तर वृत असे कि, नागपुर स्थित धंतोली येथील एका वृद्ध आईचा चाकूने वार करीत खून केल्यानंतर इंजीनियर मुलाने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची समाजमनाला हादरा देणारी घटना घडली आहे. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदुस्थान कॉलनीत मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लीला विष्णू चोपडे (वय ७८) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे, तर श्रीनिवास विष्णू चोपडे (वय ५१) असे आरोपी मुलाचे नाव आहे. मुलगा हा इंजिनिअर असून, तो बेरोजगार होता. तो आईसोबत राहायचा. काल सांयकाळी सागर इंगळे या नातेवाईकास लीला चोपडे यांच्या मुलीने फोनवर माहिती देत घरातील दोघांचेही फोन बंद असल्याची माहिती दिली. सागर घरी आला असता घर आतून बंद असल्याचे दिसले. त्याने धंतोली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत कुलूप तोडले असता बेडरुममधून दुर्गंधी आली. पोलिस बेडरुममध्ये गेले असता, त्यांना लीला चोपडे खाली पडलेल्या होत्या. तसेच तेथे श्रीनिवास याचा मृतदेह पडून होता. पलंगावर चाकू आढळून आला. तसेच आईच्या पोटावर जखमाही दिसल्या. पलंगाखाली 'इंडो सल्फान' हे विषारी औषधही आढळले. त्यामुळे मुलाने आईचा खून केल्यानंतर विषारी औषध प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. दुसरीकडे दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीची असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
'इंडो सल्फान' हे विषारी औषध प्राशन करुण इंजीनियर ने केली आत्महत्या ..!
byChandikaexpress
-
0