कोण.…मी विचार करा ..!

" जीवन मे लोकप्रिय होना है तो सबसे ज्यादा "आप" शब्द का उसके बाद " हम " शब्द का सबसे कम  "मैं" शब्द का उपयोग करना चाहीये."

 संध्याकाळची वेळ होती मी दिल्लीला जायला निघाले . रेल्वे वेळेवर आली . रिझर्व्ह सीट असल्यामुळेजागेसाठी पळापळी वगैरे करायची गरज भासली नव्हती .  रेल्वेच्या डब्यात मी माझ्या चौतीस नंबर सीटवर जाऊन बसले. अजून माझ्या बाजूच्या नंबरवर कुणीही येऊन बसले नव्हते . तेवढ्यात पुढच्या स्टेशनवर  माझे लक्ष एका मुलीकडे गेले .जी हातात मोबाईल घेऊन तिचा नंबर पाहत होती .नंतर मला कळाले की तिने तिकीट ऑनलाईन काढले होते म्हणून मोबाइलचा वापर केला. एकदम हुश्श करत  पस्तीस नंबरच्या सीटवर बसली. चेहऱ्यावर स्मितहास्य  केले तिने मला विचारले ",हॅलो !अॅन्टी कहा जाना है आपको ? मी हसून म्हणाले दिल्ली लगेच तिच्या  लगेच तिच्या बोलण्यातून तीही दिल्लीला जाणार आहे हे कळाले. तिने मला विचारले," आप कहाँ से हो तर मी सांगितलं महाराष्ट्र लगेच ती म्हणाली मतलब  मराठी  हो ना! मी तिला हो म्हणाले तिने लगेच मला सांगितलं कि ती बिहार  ची म्हणजे बिहारी आहे मी परत तिला विचारलं बिहारी मतलब कौनसी कास्ट तर तिच्या उत्तराने मी खरंच आश्चर्यचकित झाले . ती म्हणाली" अंटी मैं  बिहारी हूँ और यह मेरी पहचान है ।आप के महाराष्ट्र मे  मैने  सुना है  की वहा हिंदू , बौद्ध ,मुस्लीम ,शीख ,ख्रिश्चन इतने सारे जाती  है मगर मराठी कोई भी नही ऐसा क्यू????  खरंच या प्रश्नाने मी विचार केला  खरंच महाराष्ट्र म्हणजे मराठी; पण आपण आपल्या मराठीला सोडून जाती  प्रजाती या वादाच्या भोवऱ्यात अडकतो.सतत त्यावरून भांडण तंटे एकमेकांना आरोपाच्या पिंजऱ्यात अडकवणे  हेच तर आपल्या  राज्यात घडते नेहमी . भाषेसाठी ही लढतो आपण पण का महाराष्ट्राची शान कशात आहे हेच कळत नाही .बहुत असोत सुंदर संपन्न की महान असा हा महाराष्ट्र .  अनेक दिग्विजयी पुरस्कारांचे मानकरी असलेल्या कवी , कवयित्री, लेखक ,लेखिकांनी लाभलेला महाराष्ट्र लतादीदी ,आशा सी पं.भीमसेन जोशी सारख्या भारतरत्न मिळालेल्या गायकांचा महाराष्ट्र. अनेक ब्रिगेडियर कर्नल आणि देशाचे रक्षण आपले जीवन मानणाऱ्यांचा महाराष्ट्र .भारतरत्न सचिन तेंडुलकर ,सुनील गावसकर अशा अनेक क्रिकेट विक्रम करणा यांचा महाराष्ट्र .चौफेर बाजूंनी विकसित उज्ज्वल असणारा महाराष्ट्र आहे तर मग  महाराष्ट्र एक का नाही तो जातींमध्ये, धर्मांमध्ये का विभागला गेला आहे ."मी शिवाजी राजे  भोसले बोलतोय ."या चित्रपटाने पण मी मराठी  हा बोध आपल्या चित्रपटातून खूप चांगल्या पध्दतीने समाजाला सांगितलाय तरीसुद्धा  मराठीचा असलेला महाराष्ट्र अजूनही म्हणावा तितका जागा झालेला नाही . श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या ध्येयासाठी स्वराज्य स्थापन केले आहे त्या ध्येयाच्या सर्वांना विसर पडला आहे .कोण्या एका जातीचा महाराष्ट्र होऊ शकत नाही. तरीही काही समाजकंटक लोग फक्त आपलाच महाराष्ट्र असल्याचे चुकीचे वाद समाजात पेरतात.जसे पंजाबचे पंजाबी ,बिहारचे बिहारी, काश्मिरचे काश्मिरी ,गुजरातचे गुजराती तसेच वाचकांनो महाराष्ट्राचे मराठी हीच ओळख उदयास आली.

आज महाराष्ट्र दिन चला तर मग या मंगलदिनी आपण प्रतिज्ञा  करू या राजकारण  , जाती ,धर्म  युद्ध या सर्वांना हरवून फक्त महाराष्ट्राच्या मी मराठी म्हणून जगू या आणि दाखवून देवू या की महाराष्ट्र हा  फक्त मराठी  साठी आहे .हा कोण्या एक समाजाचा नाही.मराठी तो आहे जो महाराष्ट्रात राहतो मग तो गुजरात ,बिहार,राजस्थान, मधून येउन महाराष्ट्रात स्थायी झालेला असता तरी तो महाराष्ट्रीयन आणि मराठीच असेन.

वाचकहो,सर्वात आधी भारतीय, नंतर महाराष्ट्रीयन नंतर मराठी आणि खूपच कमी वेळ स्वःताच्या जातीशी निगडित असतो.

"स्वप्न तुमच्या डोळ्यात 

स्वाभिमान हृदयाइतिहासातील आठवणींवर विश्वास ठेवून महाराष्ट्र- मराठी बनण्याची करा सुरुवात".

मी मराठी....….मी महाराष्ट्रीयन

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जय भारत....…जय महाराष्ट्र..... जय मराठी

सौ.स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर.©

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.