बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्र पत्रकार संघाचे 18 वे अधिवेशन साईबाबाच्या शिर्डी नगरीत रविवारी ( 29 मे ) रोजी पार पडले, यावेळी डिजिटल मीडियावर पुणे लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांचे प्रमुख मार्गदर्शन आयोजित केले होते.या अधिवेशनास राज्यभरातून 500 हुन अधिक पत्रकार, पुरस्कार प्राप्त मान्यवर, त्यांचे मित्र, नातेवाईक असे जवळपास एक हजार लोक उपस्थित होते.श्री ढेपे यांनी आजवर आपली वाटचाल, पूर्वीची पत्रकारिता, आताची पत्रकारिता आणि भविष्यात होणारे बदल याविषयी पत्रकारांना संबोधित केले.हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहेत, पत्रकारांनी काळाबरोबर बदलले पाहिजे, येणारा काळ मोठा कठीण असून 5 G सुरू झाल्यावर पत्रकारांनी नेमकं काय केलं पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर , पत्रकार पुरुषोत्तम सांगळे, आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे ,भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आपल्या भाषणात श्री ढेपे यांचे व या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या, एकंदरीत कार्यक्रम छान झाला. महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन२०२२ चे नवरत्न पुरस्कार प्राप्त पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत. मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे,रोहिणी खाडीलकर-पोतणीस,श्री शैलेश सुर्यवंशी,सौ.शिखा सुरेश पिपलेवार, श्री उत्तम पवार,श्री रविंद्र गाडे,मैनोदीन शेख, श्री नरेंद्र नारखेडे, श्री मोहन (नाना ) देवकते तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पुढील प्रमाणे..श्री सुनील ढेपे -राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार, श्री सागर कोते-राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार,सौ.इंदुबाई सुनील सांगळे-राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार,श्री गौराम दादा खुळे-राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,श्री मनोहर किसन पोकळे -राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार, वेदांत बिल्डकॉन,सिन्नर -राज्यस्तरीय उद्योगभूषण पुरस्कार,श्री प्रकाश कळसगोंडा- राज्यस्तरीय उपसरपंच भूषण पुरस्कार,श्री विरभद्र पोतदार- राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार,सौ.वर्षा पर्शुराम ढेकणे-राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार, श्री देवेंद्र राजपूत -राज्यस्तरीय नवरत्न कृषी व सामाजिक पुरस्कार,डॉ.चंद्रशेखर गवळी-राज्यस्तरीय वैद्यकीय रत्न पुरस्कार,श्री दिपक तोष्णीवाल- राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार,सौ.लता विलासराव जायभाये-राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार, श्री बापुसाहेब हुंबरे- राज्यस्तरीय संपादकरत्न पुरस्कार, श्री तुकाराम तळतकर-राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, सौ.छाया शिवनाथ मस्के-राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार, सौ.हेमलता रमेश कुंभार-राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार,सौ.सुरेखा दिपक पाटील- राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, श्री दशरथ खैरनार- राज्यस्तरीय आदर्श उद्योगरत्न पुरस्कार, स्नेहल संदिप पवार- राज्यस्तरीय महिला उद्योजिका पुरस्कार, श्री प्रकाश घोडके व सौ.पुष्पलता घोडके -राज्य.आदर्श माता -पिता पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय अठरावा वर्धापन दिन शिर्डी येथील हॉटेल शांती कमल येथे पार पडला.
राज्य संपर्कप्रमुख संजय नवले व नगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ मंडलिक व संगमनेर तालुका प्रसिद्ध प्रमुख प्रमुख अकोला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे संगमनेर तालुका प्रमुख अनिल शेठ चांडक,बाबासाहेब राशिनकर, आदी सर्व टिमने यासाठी परिश्रम घेतले.यावेळी प्रिंट मिडीयाचे पत्रकार, संपादक, डिजिटल मिडीयाचे पत्रकार, संपादक, इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकार उपस्थित होते.