"रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात अध्यक्ष उपाध्यक्ष यांची अविरोध निवड"
भद्रावती (ता.प्र.) - शेतकरी शेतमजूर पॅनलद्वारा वरोरा व भद्रावती तालुक्यातील बहुतांश सेवा सहकारी संस्थेवर लोकशाही मार्गाने सत्ता बसविली जात आहे. याच धरतीवर तालुक्यातील विस्लोन सेवा सहकारी संस्था, र.न. ६९५ वर देखील शेतकरी शेतमजूर पॅनलद्वारा विजय प्राप्त करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता दुय्यम निबंधक कार्यालयात आज (दि.३०) ला सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर सहकार पॅनलचे नामदेव विश्वनाथ गोंडे यांची अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून माया शामराव राजूरकर यांची अविरोध निवड करण्यात आली. गावात राजकीय मतभेद निर्माण होवू नये, सभासदांमध्ये शांतता असावी म्हणून तालुक्यातील अनेक गावात सहकारी संस्थेच्या निवडणुका रवींद्र शिंदे यांनी अविरोध घडवून आणल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील विस्लोन येथे सहकारी संस्थेची निवडणूक ही फक्त एका महिला आरक्षित जागेकरीता झाली तर उर्वरित १० उमेदवार हे अविरोध निवडून आले. यात शेतकरी शेतमजूर सहकारी पॅनलचे ६ संचालक निवडून आल्याने या संस्थेवर शेतकरी शेतमजूर सहकार पॅनलने झेंडा फडकाविला व आजच्या सभेत अध्यक्ष तथा उपाध्यक्ष अविरोध निवडून आले. यात संचालक म्हणून पॅनल चे नामदेव गोंडे, लक्ष्मण खाडे, सुधाकर पिजदुरकर, शामराव राजूरकर, मधुकर पिजदुरकर, माया राजूरकर हे संचालक म्हणून निवडून आले आहेत. ग्रामीण भागात सातत्याने जनसेवा करण्याचे व लोकशाही पूरक चांगल्या कामाचे हे फळ असल्याचे रवि शिंदे यांनी यावेळी म्हटले.