बल्लारपुर (का.प्र.) - श्री मनोहर पिपंलकर बल्लारपुर यांच्या पत्नीला ५ वर्षापूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हापासून ते आजपर्यंत सेवाग्राम, सरकारी दवाखाना, खाजगी दवाखाने,अलॅपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सर्व पॅथीवरचे उपचार करून पाहिले परंतू त्यांना काहिच फायदा झालेला नाही. मनोहरजिंची जवळची सर्व पुंजी उपचारादरम्यान खर्च झाली.आता त्यांच्या जवळ काहीच शिल्लक नाही. मनात खूबसारे विचार येत होते. एक अचानक विचार आला, त्यानी थेट श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडल बल्लारपुर बामणीला एक अर्ज लिहून सादर केला. संस्थेचे अध्यक्ष यांना कळविण्यात आले. अध्यक्ष श्री पि.यू.जरीले यांनी अर्जाची तुरंत दखल घेऊन माडेकर सर, पुरुषोत्तम पोटे यांना घेऊन त्यांच्या घरी जाऊन शहानिशा करून तातडिची कार्यकारिणीची मिटींग घेऊन कॅन्सर ग्रस्तआला मदत देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आज दि.१/५/२२ ला कॅन्सर ग्रस्त यांचे घरी जाऊन श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडल बल्लारपुर बामणी यांचे वतीने धनादेश देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पि.यु.जरीले, उपाध्यक्ष प्रा.एम.यू.बोडे सर, सचिव प्राचार्य आर.एन.खाडे, मनोहर माडेकर, विनायकराव साळवे, संजय लाडे, पुरूषोत्तम पोटे, धनादेश देतेवेळी उपस्थित होते. तसेच श्री पि.यु.जरीले, प्रा.बोडे सर, प्राचार्य खाडे सर, विनायकराव साळवे, मनोहर माडेकर सर, संजय लाडे, प्रदीप मोरे साहेब, पुरुषोत्तम पोटे यांनीसुद्धा आर्थिक व्यक्तिगत आर्थिक मदद केली. ही रक्कम व धनादेश स्वीकारताना अश्रु अनावर झाले व त्यांनी माझ्या पत्निचे काहीतरी आयुष्य नक्कीच वाढेल असे शब्द उच्चारून सर्वांचे आभार मानले .मनोहर पिपंलकर यांचे ईच्छुकाना विनंती आहे की कॅन्सर ग्रस्त माझ्या पत्नीच्या उपचारासाठी मदत करावी.