अमरावती - (वि.प्र.) - बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता असलेले मल्टी टास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत "माय रमाई" हे मराठी गीत रमाई पुण्यतिथी निमित्ताने मल्टी टास्क या यु-ट्युब चॅनेल वर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कोटी कोटी जनांनी आई रमाई यांनी आपल्या दैनदिन जीवनात कुटुंबासाठी व परम पुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी केलेला संघर्ष या गीतामधून प्रेक्षकांना बघायला मिळणार व "माय रमाई" हे गीत लोकप्रिय गायिका सोनाली सोनवणे यांनी गायले असून ललिता वानखडे यांनी हे गीत लिहले आहे,संगीत चेतन ठाकूर यांनी दिलं आहे व सागर भोगे यांनी दिग्दर्शन केलं आहे. तसेच या गाण्याचे निर्माते श्रीहरी सरदार हे आहेत.दिग्दर्शक सागर भोगे सामाजिक विषयांवर ज्वलंत लिखाण करणारे व दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक आहेत. यांचं माय रमाई हे गाणं काल प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आणि ह्या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत वैष्णवी डवरे, विनय भगत व बाल कलाकार यश वाकळे आहेत.तसेच सह दिग्दर्शक आशिष सुंदरकर, कला दिग्दर्शक सुधीर पेंडसे,छायांकन संकलन किर्तीनंद इंगोले, रंगभूषा प्रशांत तालखंडे आहेत. हिमांशु सरदार,विशाल वानखडे, भूषण जोंधळे,प्रत्युष वानखडे,हर्षल वावरे, अक्षय नगराळे,ऋषिकेश राऊत,प्रविन ठाकरे,सचिन राजगृहे अमोल कोयकार,मयूर लोणारे, मोहण स्वर्गे, दर्शन नारनवरे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आणि ह्या गीताला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
रमाई पुण्यतिथी निमित्ताने माय रमाई हे मराठी गीत प्रेक्षकांच्या भेटीला...!
byChandikaexpress
-
0