भद्रावतीला आले छावणीचे रुप..!

विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. भद्रावती ची  निवडणूक..निवडणूक प्रक्रिया ही शांतता व लोकशाही मार्गाने होण्यासाठी आवाहन...भद्रावतीला आले छावणीचे रुप ..!

भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक आज (दि.२२) ला लोकमान्य विदयालय येथे पार पडणार आहे. दिवसभर प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी व निकाल असा जाहीर कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक एमएसी/कार्य-८/टे ३/ साल /२०२२/३९९ दिनांक १३/०५/२०२२ अन्वये चंद्रपुर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदयाचे (कलम ३७(९) (३) दिनांक १६/०५/२०२२ पासून ते दिनांक ३१/०५/२०२२ २४/०० वा. पर्यंत लागु करण्यात आले आहे. सदर निवडणुकीची आतापर्यंतची पार्श्वभुमी पाहता सदर निवडणुकी संबंधात दिनांक १९ एप्रिल रोजी भद्रावती पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा क्रमांक २७७/२२ कलम ५०४, ५०६ भांदवि तसेच दिनांक २० मे रोजी अपक. १६६/२२ कलम ३९२,३५३,३४२.३४ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिणामी दिनांक २२ मे ला होणा-या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रत्यक्ष निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊन दखलपात्र किंवा अदखलपात्र अपराध घडवून शांतता भंग होवू नये, करीता प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. शहरात दंगा नियंत्रक पथक, सहायक पोलीस अधीक्षक व पोलिसांची जादा कुमक दाखल झालेली आहे. परिणामी परिसराला छावणी चे रुप आले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शांतता व लोकशाही मार्गाने व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.