बल्लारपुर (का.प्र.) - राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशअध्यक्ष मा.जयंत पाटिल यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य तसेच महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके यांच्या आदेशानुसार बल्लारपूर येथील महाराणा प्रताप वॉर्ड येथे संयुक्त चावढी बैठक घेण्यात आली या बैठकीत वारंवार वाढत असलेल्या गॅसदरवाढी संदर्भात व रस्ते, नाली व राशन कार्ड तसेच संजय गांधी निराधार च्या काही अडचणी होत्या त्या पूर्णपणे सोडविण्यात आल्या व नळाचे पाणी यांची मागनी करण्यात आली.हि बैठक महिला शहर अध्यक्ष अर्चना ताई बुटले, उपाध्यक्ष मलेश्वरी महेशकर बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे व कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आली व तसेच त्या बैठकीत कविता ताई बुरुचुंदे कल्पनाताई राऊत तसेच पूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते व बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर लवकरच पाठपुरावा करून प्रश्न सोडवु असे आश्वासन देण्यात आले.