नागपूर (वि.प्र.) - भोई गौरव मासिक मच्छिमार समाजाचे मुखपत्र म्हणून भोई समाजात सुपरिचित आहे. भोई समाजाच्या सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय घडामोडीच्या बातम्या सोबतच वधु वरांचा परिचय सुद्धा या मासिकात छापला जातो. या मासिकाचा संपूर्ण महाराष्ट्रात मोठा सभासद वर्ग असल्यामुळे तसेच प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात या मासिकाचे प्रतिनिधी असल्यामुळे सम्पूर्ण म्हरष्ट्रातुन भोई समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडीची माहिती प्रकाशित केल्या जजाते. पोष्टाचा परवाना असल्यामुळे हे मासिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोस्टाद्वारे पोहोचल्या जाते. व महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील वधू-वरांचा बायोडाटा प्रकाशित केला जातो. त्याचाच फायदा म्हणून फक्त मे महिन्यात या मासिकाच्या माध्यमातून दहा विवाह जोडल्या गेले.तसेच दरमहा दोन- तीन विवाह जोडल्या जाते. मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत लोणारे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती कळविलीआहे. दर महिन्याला हे मासिक प्रकाशित होत असल्यामुळे दरमहा नव-नवीन वधू- वरांची माहिती या मासिकातून प्रकाशित केल्या जाते. दरमहा दहा ते बारा वधू-वरांचा नवीन बायोडाटा या मासिकात छापला जातो त्यामुळे "भोई गौरव मॅरेज ब्युरो" ला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या मुलां मुलीचे विवाह जोडण्यात या मासिकाचा समाजाला मोठा फायदा होत आहे. ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणारा भोई गौरव मासिकाचा अंक वधू- वर परीचय विशेषांक म्हणून प्रकाशित केला जाणार आहे याबाबत अधिक माहितीसाठी मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांचेशी 9960014116 या नंबरवर संपर्क करावा.