""बी"" ग्रेड "Something you will get and sometimes won't .. But try and try again it is life." "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे".ही म्हण आपण बरेचदा वाचतो, पाहतो, ऐकतो पण आत्मसात कोण करतो हेच कळत नाही.अपयश पचवायला हिंमत ही हवीच तरच यशाचे शिखर तुम्ही गाठवू शकतात. नकार ऐकला तर होकार आपण ऐकू शकतो म्हणून नकारात्मक भावना मनात ठेवायची नाही. वाचक, आपल्या भारत देशात अनेक असे दिग्गज लोक होऊन गेले आणि अजून ही आहेत की त्यांना नकार पचवता आला.नकार मिळाला तरि स्वतः मधील कुवत,योग्यता जाणून घेऊन पुढे पडायला काहीच हरकत नाही. ज्या गोष्टी साठी तुम्ही नाकारल्या जातात, अपयशी होतात त्या गोष्टींची जिद्द तुम्हांला यशाच्या होकाराच्या, प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर आणून सोडते.वाचक, भारतरत्न स्वरसाम्राज्ञी लता दी यांनाही या नकाराच्या फेऱ्यातून जावे लागले आहे. त्यांचे वडिल दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर घराचा सर्व कारभार जबाबदारी लता दी वर येऊन पडली,परंतु त्या डगमगल्या नाहीत .संगीताचे बाळकडू पिले असले तरी त्यांना स्वतःच्या आवाजासाठी खूप संघर्ष करावा लागला . खूपच बारीक आणि नाजूक आवाज म्हणून त्यांना संगीतातील जगामध्ये पहिल्यांदा नकारच मिळाला; परंतु जबाबदारी आणि जिद्द या दोन्ही गोष्टींमुळे त्या जगामध्ये नावाजल्या गेल्या. त्यांच्या आवाज सारखा आवाज या जगात नाही ही प्रतिष्ठा,प्रसिद्धी त्यांनी जगासमोर दाखविली हे त्यांच्या जिद्दीने. सुरुवातीला नकार मिळून सुद्धा आज प्रत्येकाच्या घरात,हृदयात त्यांचे मानाचे स्थान आहे.अमिताभ बच्चन सारख्या सुपरस्टारला सुद्धा या "न" जगातुन जावे लागले. सुरुवातीला त्यांनी आपल्या आवाजासाठी आकाशवाणीवर प्रयत्न केला,परंतु त्यात ते असफल झाले रिजेक्ट झाले. मग त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि त्याच कष्टाने ,जिद्दीने फिल्म दुनियातील सुपरस्टारची ख्याती मिळवली नाव कमवले. ज्या आवाजाला आधी नाकारले त्यांचे फिल्मी डायलॉग लोक आनंदाने स्वीकारतात, आत्मसात करतात,नक्कल करतात .मुमताज सत्तर च्या काळातील गाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री ज्यांना अनेक हिरोंनी आपल्या सोबत काम करायला नाकारले . दिसायला गोरीपान,किंचित अपरं नाक, मोत्यासारखे सुंदर दंतपंक्ती, भुरे डोळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावरचा गोड खट्याळ हसू आणि अभिनयाची दर्जेदार जोड असूनही फक्त साईड हिरॉईन म्हणून काम करणाऱ्या मुमताजला सर्व यशस्वी हिरोनी नाकारलं. त्यांच्या तील अभिनय पाहुन व्ही.शांताराम यांनी त्यांना एक संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. प्रेक्षकांनी तिच्या सर्व गुणाचा अभिनय स्वीकारला आणि यशाच्या पटलावर आपली यशस्वी छाप उमटवली.अनेक सुपरस्टार सोबत काम करून अनेक पुरस्कारांची मानकरी झाली.वाचकहो, सांगायचे तात्पर्य म्हणजे जर तुम्ही कोणत्या कारणांनी एखाद्या कामासाठी नाकारले गेले तरी न खचता जिद्दीने पुढे पाऊल पाहणे आवश्यक आहे.असे अनेक उदाहरणे आपल्या समोर आपल्याला दिसतील ज्यांनी अशा प्रकारचे यश संपादन केले.त्यामुळे खास विद्यार्थ्यांना हे सांगावेसे वाटते की परीक्षांच्या भितीमुळे,मार्कांमुळे घाबरून न जाता आलेल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण करा,कारण तुम्हीच या भारत देशाचे उज्ज्वल नागरिक आहात.एका अपयशाच्या मागे, नकाराच्या मागे यशाच्या अनेक वाटा दडलेले असतात फक्त जिद्दीने पुढे पाऊल टाकायला हवे.कोणी जरी ""बि ""ग्रेड म्हणून चिडवले तरी लक्ष न देता निराश न होता त्या बी ग्रेड ला"" ए ""ग्रेड कसे बनवता येईल हेच महत्त्वाचे आहे.अथांग सागरात असे अनेक हिमनग येतीलच परंतु त्या हिमनगाला पार करून कसे जायचे हे नाविकाने ठरविले पाहिजे तर वाचकहो,"समय हर समय को बदल देता है, बस समय को थोडा समय दीजिये तो आपका समय हसीन बन जायेगा."
सौ. स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर (नांदेड)